google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘रिक्षावाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील’

सातारा (महेश पवार) :

सातारा शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. कोरोनानंतर पुन्हा रिक्षावाल्यांचा व्यवसाय सुरु झाला आहे. रिक्षावाल्यांच्या अनेक समस्या असून त्या सुटल्या पाहिजेत. एक किलोमीटरसाठी ३० रुपये, मीटरची चिप बदलण्यासाठी कमी दर आकारणी करणे आदीं मागण्यांबाबत तोडगा काढावा, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांना केली. याबाबत लवकरच तोडगा काढू असे चव्हाण यांनी सांगितले.

रिक्षावाल्यांच्या भाडेवाढ, मीटरची चिप बसविण्यासाठी कमी पैसे आकारावेत, शहरात रिक्षा स्टॉप वाढवावेत, रिक्षांची संख्या जास्त झाल्याने नवीन परवाने देऊ नयेत, रस्त्यांच्या कामामुळे बंद झालेले रिक्षा स्टॉप पुन्हा सुरु करून द्यावेत, स्टॉपवर रिक्षांची संख्या वाढवावी, रिक्षाच्या पाठीमागे नाव लिहिण्याची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी साताऱ्यातील विविध रिक्षा संघटनांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली होती.

रिक्षावाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, अनिल कुर्लेकर, अनिल चिकणे, विकी रणभिसे, गिरीश खंदारे, महेंद्र जाधव, काका जाधव, विठ्ठल कांबळे, रोहन इनामदार, प्रकाश गोळे, शिरीष गोळे, बलराज त्रिंबके, प्रदीप शिरसाट, सुशांत पवार, सुरेश पवार यांच्यासह अनेक रिक्षाचालक, मालक उपस्थित होते.

यावेळी रिक्षाचालकांनी आपल्या समस्या मांडल्या. रिक्षावाल्यांना दिलासा मिळण्यासाठी त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. शासनाचे नियम असले तरी, समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो. याबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावा. यांदर्भात आपण जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करू. त्यांनाही भेटून समस्या सोडवण्याची मागणी करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. विनोद चव्हाण यांनी मागण्यांचे निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करू, तसेच समस्या सोडविण्यासाठी योग्य तोडगा काढू असे आश्वासन यावेळी दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!