
पणजी :
कारापूर येथील आंदोलनाच्या शंभराव्या दिवशी आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांना पाठिंबा दर्शविला. यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, दिल्लीच्या माजी महापौर शेली ओबेरॉय तसेच पक्षाचे आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते.
आतिशी यांनी कारापूरवासीयांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक करत, आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास एका महिन्याच्या आत कलम ३९अ तसेच त्याअंतर्गत देण्यात आलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात येतील, अशी घोषणा केली.
भाजप सरकार कलम ३९अच्या माध्यमातून गोव्यातील शेतीजमिनींवर मोठे प्रकल्प उभारून बिल्डर आणि राजकीय हितसंबंध जपत असल्याचा आरोप त्यांनी केला. करापूरचे आंदोलन हे केवळ एका गावाचे नसून संपूर्ण गोव्याच्या भूमी संरक्षणासाठीचा लढा असल्याचेही त्यांनी सांगितले.





