google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

आमदार दाजी साळकरांनी केली विकासकामांची पाहणी

वास्को:
वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी वास्को येथील बागायतदार बाजाराजवळ मूरगावच्या उपजिल्हाधिकारी, गॅमन इंडियाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह महामार्गाला जोडणाऱ्या रॅम्पच्या नियोजित जागेची पाहणी केली.

वास्को हे नियोजनबद्ध शहरापैकी एक आहे. मात्र सध्या शहरात ज्या पद्धतीने विकास कामे केली जात आहे ते पाहता, शहराचे सौंदर्य नष्ट होण्यासोबत शहरात वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरातील आयओसी जंक्शन, एफएलगोम्स मार्गावर, गोवा बागायतदार व भाजी मार्केट समोर होणारी प्रस्तावित रॅम्प प्रकल्पाला बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टने आक्षेप घेतला आहे.

या प्रकल्पामध्ये एमपीएमध्ये जाणाऱ्या उड्डाणपुलाला जोडून वास्को शहरात उतरण्यासाठी येथील गोम्स महामार्गावर उड्डाणपुलाचा एक भाग उतरला जाईल. त्यासाठी एफ एल गोम्स मार्गावर या प्रस्ताविक प्रकल्पासाठी रॅम्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेच्या तक्रारीला अनुसरून वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी वास्को येथील गोम्स मार्गावरील प्रस्ताविक रॅम्प प्रकल्पाच्या ठिकाणी म्हणजेच गोवा बागायतदार बाजाराजवळ गेमेन इंडियाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह महामार्गाला जोडणाऱ्या या रॅमच्या नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी वाहतूक खात्याचे पोलीस उपाधीक्षक धर्मेश आंगले उपस्थित होते. तसेच समाजसेवक सावियो कुतिन्हो ज्याचा या रॅम प्रकल्पाला विरोध आहे तेही उपस्थित होते.

दरम्यान वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी बोलताना सदर प्रास्तावित प्रकल्पाच्या नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी आज बोलावण्यात आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली असून, काही तक्रारींना अनुसरून सदर पाहणी केली असल्याचे ते म्हणाले. लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा बैठक बोलावून या प्रकल्पाविषयी विचार विनिमय केला जाईल असे साळकर म्हणाले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!