google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘जनतेचा विश्वास मिळवून राज्यात काँग्रेस करणार अधिक बळकट’


पणजी :

अखिल भारतीय काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि गोव्यात पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकून पक्ष मजबूत करण्यासाठी गोव्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत समर्पणाने काम करतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षांनी आज नवी दिल्ली येथे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अमित पाटकर म्हणाले की, लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीत तळागाळातून वर येवून सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या आमच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

आजच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो नसलो तरी काँग्रेस पक्ष संघटनेसोबत एकसंघपणे काम करण्यास काँग्रेस विधिमंडळ पक्ष कटिबद्ध आहे. गोव्यातील लोकांचे प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करू . गोव्यात लवकरच एक मजबूत काँग्रेस दिसेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केला.

दोन्ही काँग्रेस नेत्यांनी मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. पक्ष संघटना बांधणीसाठी त्यांनी नि:स्वार्थपणे काम केले आहे. त्या यापुढेही पक्षाला मार्गदर्शन करत राहतील, असा विश्वास अमित पाटकर यांनी व्यक्त केला.

आमचे नेते राहुल गांधी भारताला एकसंघ ठेवण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत आहेत. ‘आयडिया ऑफ इंडिया’चा संदेश देण्यासाठी ते अथक परिश्रम घेत आहेत. त्यांची भारत जोडो यात्रा देशात परिवर्तन आणेल, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

गोव्यातील काँग्रेस पदाधिकारी लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. नूतन अध्यक्षांच्या दिशानिर्देशानुसार आम्ही काम करू, असे अमित पाटकर म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाच्या लवकरच राज्यस्तरावर विविध समित्या गठीत करून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!