google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘गोव्यातील ‘या’ किल्ला परिसराला देणार नवे रूप’

Chhatrapati Shivaji Maharaj Fort in Goa : आज 19 फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात छत्रपत्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. स्वराज्य घवडण्यासाठी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन लढा देणाऱ्या शिवरायांना आज मानवंदना दिली जाते.

गोव्यात फर्मागुडी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शिवजयंती निमित्त छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित लोकांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. फर्मागुडीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे तसेच माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सौंदर्यीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी 2023 च्या राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी नियोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच इथल्या मंदिर परिसराचेही सौंदर्यीकरण करण्यासाठी मास्टरप्लॅन करण्याचा सरकारचा मानस आहे.

फोंडा तालुका हा देवभूमी म्हणून विकसित करण्यासाठी आणि गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत@100 यानिमित्त देशभरात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी गोव्यातही वर्षभर अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिवजयंतीनिमित्त आणि गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यभरातील सगळ्या किल्ल्यांचे नूतनीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच आजच्या तरुण पिढीला शिवरायांचे विचार, त्यांची राजनीती आणि त्यांचे धोरण समजण्यासाठी पहिल्यांदाच गोवा विद्यापीठात संशोधन चेअर स्थापित करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!