google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

नोकरभरतीसाठी कोकणीचे ज्ञान बंधनकारक

Konkani :  गोव्यातील राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज, बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात अ, ब वर्गातील नोकरभरतीसाठी कोकणीचे ज्ञान बंधनकारक असेल, असा निर्णय झाला आहे.

मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची माहिती दिली.

त्यानुसार आता डीडीएसएसव्हाय आरोग्य कार्डधारकांना आभा कार्ड नोंदणी बंधनकारक असणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यातून उद्योग करू इच्छिणाऱ्यांना मदत मिळणार आहे.

याशिवाय अ आणि ब वर्गातील नोकरभरतीसाठी कोकणी भाषेचे ज्ञान असणे आता बंधनकारक केले गेले आहे.

दरम्यान, राज्यातील जमिन हडप प्रकरणांच्या एसआयटीचा अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत येणार होता, अशी चर्चा होती. तथापि, हा अहवाल बैठकीत मान्यतेसाठी आला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पणजीतील स्मार्ट सिटीची कामे जून महिन्यापर्यंत पूर्ण होतील. जी२० च्या बैठका आणि पावसामुळे या कामाला विलंब झाला. स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्स यांच्याशी माझे बोलणे झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!