‘…हा गोमंतकीय कलाकारांचा विजय’
पणजी :
भाजप सरकारची माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने “व्हेस्ट आर्ट पार्क” साठी काढलेल्या निविदा मागे घेण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. सदर कामासाठी लागणारी ८.९२ कोटींची रक्कम आता स्थानिक कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी खर्च करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
ही तर फक्त सुरुवात आहे. मी ६ ऑक्टोबर २०२२ रोजी हे प्रकरण उघड केले होते आणि “भ्रष्टाचाराचे स्मारक” तयार करण्याची निवीदा रद्द करावी अशी मागणी केली होती. सरकारच्या प्रत्येक प्रकल्पावर विशेषत: मिशन कमिशनच्या अजेंड्यावर जे प्रकल्प केले जातात, त्याबाबत काँग्रेस पक्ष सतर्क राहील. आम्ही सरकारला वायफळ खर्च करू देणार नाही असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.
निविदा रद्द झाल्यामुळे ८.९२ कोटी रुपयांची रक्कम आता स्थानिक कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी खर्च करावी, अशी माझी मागणी आहे. निविदा रद्द करणे म्हणजे गोमंतकीय कलाकारांचा विजय आहे असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.