google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

विधानसभा अधिवेशन : सोमवारी ठरणार विरोधी आमदारांची रणनीती


मडगाव :

गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनाबाबत रणनीती आखण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा आणि मौन कामकाज करण्याच्या भ्याड भाजप सरकारच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी, २६ डिसेंबर २०२२ रोजी सात विरोधी आमदारांची बैठक होणार आहे. हम साथ साथ है, रहेंगे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.


मी विरोधी पक्षातील माझ्या सर्व सहा सहकार्‍यांशी वैयक्तिकरित्या बोललो आहे आणि सर्वांनी सोमवारी भेटून सरकारला धारेवर धरण्यासाठी रणनीती तयार करण्याचे मान्य केले आहे. आम्ही सात जण नक्कीच सरकारला कोंडीत पकडू, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.


गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आपचे आमदार वेन्झी व्हिएगास आणि क्रूझ सिल्वा आणि आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांच्यासह काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरैरा आणि एल्टन डिकोस्ता या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.

भाजप सरकार विरोधकांना घाबरते हे स्पष्ट आहे. विधानसभेच्या तारांकीत प्रश्नांतून मागील केवळ पाच वर्षांचीच माहिती घेता येणार अशा आशयाची सभापतींनी जारी केलेली अधिसूचना पाहून मला धक्का बसला, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.


विरोधी आमदारांचा आवाज बंद करण्याची ताकद सरकारकडे नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात घेतले पाहिजे की, ६७ टक्के गोमंतकीयांनी गेल्या दहा वर्षातील भाजप सरकारच्या कारभाराविरूद्ध विधानसभा निवडणूकांत मतदान केले आहे. प्रत्यक्षात विरोधी पक्षाला गोव्यातील जनतेचा जनादेश आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

युरी आलेमाव


आयआयटीसाठी नायलॉन 66, सेझ किंवा फर्मागुडीची जमीन वापरा’

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आयआयटी प्रकल्पासाठी नवीन जमीन सरकार शोधणार असल्याच्या केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी ट्विट केले की, केरी येथील नायलॉन ६६ प्रकल्पाला दिलेली सरकारची जमिन, ३ एसईझेडनां दिलेली जमीन, फर्मागुडी येथे उपलब्ध असलेल्या जमिनीत आयआयटी प्रकल्प बांधा. झुवारी अॅग्रोला दिलेल्या जमिनीचे रिअल इस्टेट लॉबीकडून होणारे शोषण थांबवा. सदर जमिन परत घ्या आणि शैक्षणिक संस्थेसाठी वापरा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!