google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

कर्नाटकमधील भाषण अमित शहा गोव्यात करणार का? : काँग्रेसचा रोकडा सवाल

पणजी :

गृहमंत्री अमित शहा यांनी काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात जे भाषण केले होते, तेच भाषण गृहमंत्री अमित शहांकडून आज परत ऐकण्यासाठी गोमंतकीय आतूर आहेत. कर्नाटकात राजकीय फायदा मिळवण्यासाठी भाजपने गोव्याच्या हिताशी तडजोड केली हे गोमंतकीयांना  पुन्हा एकदा स्पष्ट करा अशी मागणी  काँग्रेस पक्षाने केली आहे.


कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू दिले जाणार नाही असे म्हटल्याचा दावा करणाऱ्या अमित शहांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून काँग्रेसने भाजपला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला.


2018 मध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या मालकीच्या कारखान्यातून गोव्यात जप्त करण्यात आलेल्या 100 किलो अत्यंत हानिकारक केटामाइन ड्रगच्या जप्तीच्या चौकशीचा स्टेटस रिपोर्ट बघण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची गोमंतकीय आतुरतेने वाट पाहत आहेत, असा दुसरा बोचरा बाण काँग्रेसने आपल्या समाजमाध्यमांवरुन मारला.

अत्यंत असंवेदनशील आणि अमानवीय भाजप सरकार गोव्यातील सिद्धी नाईकच्या गूढ मृत्यूची गेल्या 3 वर्षात चौकशी करण्यात अपयशी ठरले आहे. सीबीआय किंवा केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा ताबा का घेतला नाही आणि तिच्या कुटुंबाला न्याय का दिला नाही, हे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट करावे अशी गोमंतकीयांची इच्छा आहे. हा आहे भाजपच्या बेटी बचावचा विकृत चेहरा, असा तिसरा टोला काँग्रेसने हाणला.

काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पर्यावरणाचा ऱ्हास, कोळसा हब, बेरोजगारी, केंद्रीय अनुदान, महागाई, म्हादई असे सहा मुद्दे उपस्थित केले होते.

भ्रष्टाचार, गुन्हे, आर्थिक मंदी, वित्तीय गैरव्यवस्थापन आणि इतर मुद्दे उपस्थित करत काँग्रेस भाजपच्या विरोधात आक्रमक प्रचार करीत आहे आहे. गोवा काँग्रेसच्या  21  कलमी जाहिरनाम्यातून गोव्याची अस्मिता राखण्याचे आश्वासन गोमंतकीयांना दिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!