google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

राज्यातील शेतकरी त्रस्त, अन् भाजप उत्सवात व्यस्त : एल्टन डिकोस्ता

मडगाव :

काजू उत्पादक शेतकरी त्रस्त असताना भाजप उत्सव साजरे करत आहे. भाजप सरकार त्यांना ₹175 प्रति किलो आधारभूत मूल्य प्रदान करण्यात अयशस्वी ठरले परंतु गोवा वन विकास महामंडळ काजू फेस्ट कार्यक्रमात बिगर गोमंतकीय कलाकारांच्या कार्यक्रमांवर करोडो खर्च करणार आहे. भाजपची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. आता भाजपचा पराभव हाच उपाय आहे, असा टोला केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी हाणला आहे.


भाजप सरकारने पणजी येथे 10 ते 12 मे 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या काजू फेस्ट 2024 वर प्रतिक्रिया देताना, एल्टन डिकोस्ता यांनी काजू शेतकऱ्यांबद्दलच्या असंवेदनशीलतेबद्दल भाजपवर टीका केली.


सरकारकडे काजू उत्पादकांना आधारभूत किंमत देण्यासाठी पैसे नाहीत पण कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च करणार आहेत. तीन दिवसीय महोत्सवात बिगर गोमंतकीय कलाकारांना आमंत्रित आले असून त्यांच्यावर करोडो उढळणे ही धक्कादायक बाब आहे, असे एल्टन डिकोस्ता म्हणाले.

इव्हेंटचा माज भाजपच्या डोक्यात गेला आहे. ते फक्त गोव्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची वाट पाहत होते. इव्हेंट्स हे भाजपसाठी मनी मेकिंग मशीन बनले आहे, असा आरोप एल्टन डिकोस्ता यांनी केला आहे.

मी काजू तसेच नारळ, ऊस आणि इतर शेतकऱ्यांना आवाहन करतो की, शेतकरी विरोधी भाजप सरकारने त्यांच्यावर लादलेले त्रास आणि कष्ट लक्षात ठेवा. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपचा पराभव करुन सदर कष्टांची परतफेड करण्याची वेळ आली आहे, असे एल्टन डिकोस्ता म्हणाले.

काही दिवसांपूर्वी भाजपने काजूचे समर्थन मूल्य वाढवले जाईल अशी अफवा पसरवली होती. जेव्हा मी सदर मूल्य 175 प्रति किलो असावे अशी मागणी केली तेव्हा ते भाजप सरकारने हळूच प्रस्तावच मागे घेतला, असे एल्टन डिकोस्ता यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!