‘बाकीबाब ते आयज’चे उद्या सादरीकरण
मडगाव :
कोंकणी भाशा मंडळच्यावतीने उद्या ३० नोव्हेंबर रोजी ‘बाकीबाब ते आयज’ या विशेष काव्य संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोंकणी भाशा मंडळ, मडगांवच्या सभागृहात संध्याकाळी ४.३० वाजता सदर कार्यक्रम होणार असून, यामध्ये ‘बाकीबाब यांच्या कविता आणि त्याचप्रमाणे कोंकणी कवितेतील तरुण कवींच्या कविता ऐकण्याची संधी लाभणार आहे.
कला अकादेमी थियेटर कॉलेजचे प्राचार्य, कवी डॉ. राजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सारिका नायक, दिगज बेणे, अद्वैत साळगांवकार, ममता वेर्लेकार, विश्वप्रताप पवार, रिया बेंगलोरकार, ऐश्वर्या नायर, महादेव गांवकार, डॉ. तन्वी कामत बांबोळकार, गौरांग भांडिये, आकाश गांवकार आनी अनीश अग्नी आदी तरुण कवी यात सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रम सर्व साहित्य रसिकांसाठी खुला असून रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे कोंकणी भाशा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ यांनी केले आहे.