google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन

युनायटेड स्टेट्सचे माजी मंत्रीसचिव, नोबेल विजेते हेन्री किसिंजर (Henry Kissinger) हेन्री किसिंजर यांचे बुधवारी (दि.२९) निधन झाले. कनेक्टिकट येथील त्यांच्या घरी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याबबत किसिंजर असोसिएट्स इंक यांनी निवेदन देत माहिती दिली. (Henry Kissinger)

किसिंजर यांचा जन्म 1923 मध्ये जर्मनीमध्ये झाला. 1938 मध्ये ते अमेरिकेत आले. नंतर, 1943 मध्ये, ते अमेरिकन नागरिकत्व स्विकारले. त्यानंतर तीन वर्षे अमेरिकन सैन्यात सेवा केली. याशिवाय त्यांनी काउंटर इंटेलिजन्स कॉर्प्समध्येही काम केले आहे. बॅचलर, मास्टर्स आणि पीएचडी पदवी मिळवल्यानंतर त्यांनी हार्वर्डमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवला. 1969 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. हे पद त्यांच्यासाठी खूप महत्त्वपुर्ण ठरले. किसिंजर भारत-पाक युद्ध 1971 दरम्यान चर्चेत होते. युद्धादरम्यान त्यांची भूमिका खूप वादग्रस्त होती. या युद्धामुळे बांगलादेश हा स्वतंत्र देश जगाच्या नकाशावर उदयास आला.

Henry Kissinger

किसिंजर (Henry Kissinger) यांनी रिचर्ड निक्सन आणि जेराल्ड फोर्ड या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. यंदा 27 मे रोजी त्यांनी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. हेन्री किसिंजर हे आधुनिक अमेरिकन इतिहासातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेत. व्हिएतनाम युद्ध संपवण्यात आणि अमेरिकन सैन्याच्या माघारीत त्यांनी मोठी भूमिका बजावली.

हेन्री किसिंजर (Henry Kissinger) यांनी ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात अमेरिकन सरकारचे गृहमंत्री व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. या काळात उत्तर व्हिएतनामशी झालेला पॅरिस शांतता करार, इस्रायल व इतर अरब राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, त्या काळी आंतरराष्ट्रीय शांततेसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या अमेरिका-रशिया शस्त्र निर्बंध चर्चा, चीनशी धोरणात्मक संबंधांची सुरुवात अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हेन्री किसिंजर यांनी समर्थपणे पार पाडल्या.

हेन्री किसिंजर (Henry Kissinger) यांना व्हिएतनाम युद्धादरम्यान निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. १९७३ साली झालेल्या व्हिएतनाम युद्धबंदीसाठी त्यांनी उत्तर व्हिएतनामशी यशस्वीरीत्या चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांना व उत्तर व्हिएतनामचे ली ड्यूक थो यांना संयुक्तपणे हा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. एकीकडे किसिंजर यांनी मोठ्या सन्मानाने या पुरस्काराचा स्वीकार केला असताना दुसरीकडे ली ड्यूक थो यांनी मात्र हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. किसिंजर यांच्या निवडीमुळे झालेल्या वादातूनच तत्कालीन नोबेल पुरस्कार निवड समितीतील दोन सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा त्याग केला होता.

Henry Kissinger

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!