‘जस्ट डायल’मुळे गोव्यात व्यावसायिक विकासाला चालना
Just dial:
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं आणि ‘पाचूचं बन’ म्हणून ओळखलं जाणारं गोवा हे राज्य शेती, खाणकाम आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. १५.७८ लाख लोकसंख्येच्या या राज्यात मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज (एमएसएमईज) केंद्रीय मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेले ६७,९४८ व्यवसाय कार्यरत आहे.
स्थानिक एमएसएमईजना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी, केंद्र सरकार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. राज्याने क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेसद्वारे (सीजीटीएमएसई) कर्जाची हमी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
सरकारच्या या उपक्रमांबरोबरच जस्टडायल गोव्यातील स्थानिक व्यवसायांना डिजिटल विकास करण्यासाठी मदत करत आहे. आपल्या विविध डिजिटल उपक्रमांद्वारे कंपनी संभाव्य ग्राहक व व्यवसायांना जोडत आहे. हा प्लॅटफॉर्म व्यवसायांना खरेदीसाठी तयार असलेले ग्राहक मिळवून देण्यासाठी कार्यरत असून पारंपरिक मार्केटिंग तंत्रांपेक्षा जास्त चांगले परतावे त्यांना देत आहे.
जस्टडायलच्या डिजिटल उत्पादनांच्या सर्वसमावेशक श्रेणीचा वापर करत गोवा स्थित व्यवसाय आपले कार्यक्षेत्र विस्तारत आहेत.
व्यवसाय विस्तारण्यात जस्टडायल मुळे होत असलेल्या मदतीबाबत म्हापसातील साई टेलिकॉमचे मालक सनी साहू म्हणाले, “जस्ट डायलबरोबर केलेली भागिदारी आमच्या व्यवसायासाठी क्रांतीकारी ठरली. या प्लॅटफॉर्मचा एक भाग झाल्यापासूनच आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांत वाढ होऊन संभाव्य ग्राहकांची संख्या १००० ते १५०० पर्यंत वाढली आहे. जस्टडायलचा वैयक्तिक पाठिंबा आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी, विविध शहरांतून मागणी मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. आमच्या यशात जस्टडायलच्या असामान्य सेवेचा मोठा वाटा आहे.’
खरेदीसाठी सज्ज असलेल्या ग्राहकांना संबंधित व्यवसायांशी एकमेकांशी जोडण्याची या प्लॅटफॉर्मची क्षमता जबरदस्त असून त्यामुळे पारंपरिक मार्केटिंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावरील परतावे लक्षणीय आहेत.
हीच भावना आणि जस्टडायलमुळे व्यवसायात झालेली वाढ याविषयी वकील सनी एस कलंगुटकर यांनी आपला दहा वर्षांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “कायदे व्यवसायाचा जम बसवण्यासाठी मी मोठ्या प्रमाणावर जस्टडायलची सेवा घेतली आहे. माझ्यापर्यंत येणारे ग्राहक दर्जेदार असतात. कंपनीचे प्रतिनिधी माझ्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींचे तातडीने निरसन करतात. मी जस्टडायलतर्फे दिल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण आणि कौतुकास्पद सेवेबद्दल पूर्ण समाधानी आहे.”
स्थानिक व्यवसायांचा विकास करण्याप्रती जस्टडायलची बांधिलकी ठळक यशोगाथेमध्ये परिवर्तित झालेली आहे. गोवा स्वीट्स हॉलिडे होम्स, गोवाचे मालक यशपाल सिंग यांनीही गेल्या दोन वर्षांत जस्टडायलसह केलेल्या भागिदारीमुळे व्यवसायवृद्धी झाल्याचा अनुभव मांडला. “माझ्या हॉलिडे होम व्यवसायाची समीकरणे बदलण्यासाठी जस्टडायलची मोठी मदत झाली. त्यांच्याशी भागिदारी केल्यापासून आमच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. जस्टडायलने मोठ्या प्रमाणावर पुरवलेल्या ग्राहकवर्गामुळे हे शक्य झाले. त्यांच्या टीमने दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले.”
गोव्यात डिजिटल उपक्रमांचा प्रसार होत असतानाच जस्टडायल एमएसएमईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विविध प्रकारच्या डिजिटल सुविधा आणि वैयक्तिक मदतीच्या जोरावर स्थानिक व्यवसायाची यंत्रणा ते उभी करत आहेत. अशाप्रकारचा डिजिटल प्रसार इतर प्रदेशांत करून देशभरातील व्यवसायांना सक्षम करण्यासाठी जस्टडायल बांधील आहे.