google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

घर आणि गाडीचा EMI वाढणार…

मुंबई  :
रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अचानक पत्रकार परिषदेत रेपो दरात मोठी वाढ केली आहे. रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता रेपो दर ४.४० टक्के करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या म्हणण्यानुसार, रेपो रेटमध्ये वाढ कमोडिटीज आणि वित्तीय बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे लोकांवर ईएमआयचा बोजा वाढणार आहे. रेपो दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार, हे निश्चित आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांच्या बजेट कोलमडून जाणार आहे. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर गृहकर्ज आणि कार कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर वाढतील, त्यामुळे ईएमआयची रक्कम वाढेल.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मार्च २०२२ मध्ये किरकोळ महागाई झपाट्याने वाढली आणि ७ टक्क्यांवर पोहोचली. रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गव्हासह अनेक धान्यांच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवरही वाईट परिणाम झाला आहे.” आरबीआयने साडेचार वर्षांनंतर पॉलिसी दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट २०१८ नंतर प्रथमच धोरणात्मक दरात वाढ केली आहे.

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की मध्यवर्ती बँकेने गेल्या महिन्यातच आपली उदारमतवादी भूमिका मागे घेण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. त्यांच्या घोषणेनंतर, आरबीआय जूनमध्येच बेंचमार्क दर वाढवू शकते असा अंदाज वर्तवला जात होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ७.८ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत अर्थव्यवस्था १७.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७ टक्के, तिसर्‍या तिमाहीत ४.३ आणि चौथ्या तिमाहीत ४.३ टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!