google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

इन्फिनिक्सने लॉन्च केला ढांसू स्मार्टफोन

मुंबई :
गेल्या वर्षी हॉट १० प्लेला मिळालेल्या भव्य यशानंतर इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आपल्या हॉट पोर्टफोलिओचा विस्तार करत फुली-लोडेड मनोरंजन अनुभवासाठी ‘हॉट १२ प्ले’ स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हॉट १२ प्ले आधुनिक काळातील युजर्सना विनाव्यत्यय मनोरंजनाची खात्री देतो आणि ३० मेपासून फ्लिपकार्टवर ८,४९९ रूपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. ४ जीबी रॅम / ६४ जीबीसह ३ जीबी विस्तारित मेमरी व्हेरिएण्टमध्ये उपलब्ध हॉट १२ प्ले रेसिंग ब्लॅक, होरिझोन ब्ल्यू (हिरो कलर), शॅम्पेन गोल्ड आणि डेलाइट ग्रीन या चार आकर्षक रंगांमध्ये येईल.

हॉट १२ प्लेमध्ये विभागातील सर्वोत्तम डिस्प्ले, सर्वोत्तम बॅटरी, सर्वोत्तम कार्यक्षमता आणि हॉट सिरीजमधील पूर्वीच्या डिवाईसेसच्या तुलनेत काही प्रमुख अपग्रेड्स असतील. उल्‍लेखनीय वैशिष्ट्ये, शक्तिशाली प्रोसेसर, आधुनिक ओएस, विस्तारित मेमरी आणि सुधरित कॅमेरा असलेला हा फुली-लोडेड स्मार्टफोन सर्वोत्तम, सर्वसमावेशक व सर्वांगीण अनुभव देतो.

सर्वात मोठे व प्रखर डिस्प्ले: इन्फिनिक्सचा रिफ्रेशिंग नवीन हॉट १२ प्लेमध्ये ६.८२ इंच डिस्प्लेसह विभागातील सर्वात मोठे एचडी+ रिझॉल्युशन, फर्स्ट–इन-सेगमेंट ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १८० हर्ट्झ टच सॅम्प्लिंग रेट आहे, ज्यामुळे डिवाईस अत्यंत सुलभपणे कार्यरत राहतो. तसेच हा किफायतशीर विभागामध्ये मध्यभागी पंच-होल डिस्प्ले असलेला एकमेव डिवाईस आहे.

उच्च दर्जाची कार्यक्षमता व व्यापक स्टोरेज क्षमता: आधुनिक अँड्रॉईड ११ वर संचाजित इन्फिक्स हॉट १२ प्लेमध्ये युनिएसओसी टी६१० प्रोसेसरसह जवळपास १.८२ गिगाहर्ट्झ गती असलेले सीपीयू आणि उच्च कार्यक्षम १२ एनएम प्रॉडक्शन प्रक्रिया आहे. ४ जीबी रॅम/ ६४ जीबी मेमरी व्हेरिएण्टमध्ये उपलब्ध हा डिवाईस जवळपास ३ जीबीपर्यंत विस्तारित करता येणारी व्हर्च्युअल रॅमसह येतो.

सुधारित कॅमेरा: नवीन हॉट १२ प्ले दर्जात्मक कॅमेरा देण्याची इन्फिनिक्सची पंरपरा कायम ठेवतो. या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरासह समर्पित क्वॉड-एलईडी फ्लॅश आहे आणि हे वैशिष्ट्य असलेला विभागातील हा एकमेव डिवाईस आहे. स्मार्टफोनच्या पुढील बाजूस ८ मेगापिक्सल इन-डिस्प्ले सेल्‍फी कॅमेरासह समर्पित ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. हे वैशिष्ट्य असलेला विभागातील एकमेव डिवाईस आहे.

विशाल क्षमतेची बॅटरी: हॉट १२ प्लेमध्ये विभागातील सर्वात मोठी ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी स्मार्टफोनला दीर्घकाळापर्यंतच्या वापरानंतर देखील कार्यरत ठेवते. तसेच १० वॅट चार्ज सपोर्टसह टाइप सी केबल असलेला हा विभागातील एकमेव डिवाईस आहे, ज्यामुळे युजर्सना दीर्घकाळापर्यंत त्यांच्या आवडत्या मनोरंजनाचा आनंद घेता येईल, ज्यासाठी वारंवार फोन रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.

इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष कपूर म्‍हणाले, “ग्राहकांना अर्थपूर्ण नवोन्मेष्कारी देण्यासाठी २०१७ मध्ये इन्फिनिक्स हॉट सिरीज लॉन्च करण्यात आली आणि तेव्हापासून या सिरीजला उच्च दर्जाचा डिस्प्ले, कार्यक्षमता व बॅटरी अशा अनेक एफआयएसटी (फर्स्ट इन सेगमेंट टेक्नोलॉजी) वैशिष्ट्यांसह ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हॉट १२ प्लेचा सर्वोत्तम व प्रबळ अनुभव अधिकाधिक ग्राहकांसाठी अनुकूल डिवाईस डिझाइन करण्याकरिता सातत्यपूर्ण चाहते व ग्राहकांच्या सहभागांमुळे शक्य झाले आहे. या महत्त्वाकांक्षी डिवाईसमध्ये व्हर्च्युअल रॅम, हेवी-ड्युटी ६००० एमएएच बॅटरी आणि ६.८२ इंच पंच होल स्क्रिन असण्यासोबत कार्यक्षमता व आकर्षकतेची परिपूर्ण संयोजन आहे. म्हणून हा ९ हजार रूपयांखालील पॉवर-पॅक डिवाईस आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!