google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीमहाराष्ट्र

पाचवेळा हृदयविकाराच्या झटक्यानंतरही वाचला महिलेचा जीव

नवी मुंबई : 
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील आपत्कालीन कक्षात (ईआर) ६१ वर्षीय श्रीमती गुलझार अदातिया यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना दाखल करण्यात आले. ईआर मध्ये त्यांना पाच मोठे हृदयाचे झटके आले आणि क्रिटिकल केअर तज्ञांच्या टीमने कार्डिओ-पल्मनरी रिससिटेशन (सीपीआर) द्वारे त्यांना पाच वेळा नवीन जीवन प्रदान केले. रुग्णाला व्हेंटिलेटरद्वारे इंट्यूबेट केले गेले आणि आयनोट्रोप्ससह हृदयाचे ठोके नियंत्रित करणारी औषधे दिली गेली. त्यांचे हृदय आणि श्वासोच्छ्वास स्थिर झाल्यानंतर कोरोनरी अँजिओग्राम करण्यात आले. यामुळे त्यांच्या हृदयाच्या दोन मुख्य धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या असल्याची खात्री पटली. या स्थितीला स्टेंट थ्रोम्बोसिस म्हणतात. इतर उपचारांसह त्यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची तब्येत अगदी बरी झाली आणि त्यांना तिसऱ्या दिवशी वॉर्डमध्ये हलवण्यात आले.

 

स्टेंट थ्रोम्बोसिस ही पर्क्युटेनियस कोरोनरी इंटरव्हेन्शनची (पीसीआय) एक गंभीर समस्या आहे, पर्क्युटेनियस कोरोनरी इंटरव्हेन्शन ही कोरोनरी (हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी) धमन्या अनब्लॉक करण्यासाठी वापरली जाणारी किमान त्रासदायक प्रक्रिया आहे. पीसीआय ही एक प्राण वाचवणारी प्रक्रिया आहे, मात्र वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातक ठरु शकते. या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तज्ञांची आवश्यकता असते आणि हृदयाच्या अवरोधित धमन्यांमध्ये पुन्हा रक्त पुरवठा सुरु करण्यासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक असते.

डॉ. गुणाधार पाधी, सल्लागार-क्रिटिकल केअर तज्ञ, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले की,”रुग्णाच्या हृदयात अनेक समस्या (गुंतागुंत) असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तीव्र मायोकार्डियल इन्फ्राक्शन, लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर, कार्डिओजेनिक शॉक आणि त्यांच्या संपूर्ण हृदयात ब्लॉक होते. त्यांना बरे करण्यासाठी आणि स्थिरस्थावर करण्यासाठी आम्ही लगेच पावले उचलली. त्यांना इंट्रा-आर्टिक बलून पम्प (आयएबीपी) थेरपी देण्यात आली. रक्तवाहिन्या अनब्लॉक करण्यासाठी आणि रक्त अधिक प्रमाणात पम्प करण्याची हृदयाची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही अँजिओप्लास्टी देखील केली.”

त्यांच्या हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी तात्पुरते पेसमेकर लावण्यात आले आणि आर्टिरियल थ्रोम्बस ऍस्पिरेशन किंवा ब्लॉकेज दूर करण्यासाठी रक्तवाहिन्यातील गुठळ्या कमी करण्यात आल्या, अशा इतर उपचारांसह रुग्णावर यशस्वीपणे अँजिओप्लास्टी करण्यात आली. या वैद्यकीय टीममध्ये अपोलो क्रिटिकल केअर तज्ञ सल्लागार डॉ.गुणाधार पाधी, कार्डिओलॉजी सल्लागार डॉ. केशव दादा काळे, मेडिसिनचे प्रमुख डॉ.नितीन जगासिया यांचा समावेश होता.

संतोष मराठे, सीईओ-पश्चिम क्षेत्र प्रादेशिक, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले की,”वेळेवर उपचार दिल्यामुळे आणि वैद्यकीय सेवा पुरवल्यामुळे रुग्णाला पुनर्जीवन मिळाले आणि स्थिरस्थावर होण्यास मदत झाली, म्हणून आवश्यक वैद्यकीय उपचार केले पाहिजेत. ईआर मध्ये एकापाठोपाठ पाच हृदयाच्या झटक्यानंतरही रुग्णाला मिळालेले नवे जीवन आणि त्यानंतर प्रदान केलेले उपचार तसेच रुग्णाची झालेली रोगमुक्तता हा अपोलो हॉस्पिटल्सच्या अत्याधुनिक ईआर आणि उच्च प्रशिक्षित ईआर, कार्डियाक सर्जिकल, परिचारिका आणि रुग्णसेवा प्रदान करणारी टीम सर्वोच्च मानकांचे पालन करत असल्याचा दाखला आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!