google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

एअर इंडियाचा ‘हा’ नवा लोगो पाहिला का?

मुंबई:


टाटा समूहाच्या मालकीची एअरलाइन, एअर इंडियाने आज त्यांच्या नवीन ब्रॅंड ओळख आणि नवीन एयरक्राफ्ट लिव्हरीचे अनावरण केले, जे धाडसी नवभारताला प्रतिबिंबीत करते. या राष्ट्रीय संस्थेला राष्ट्रीय प्रेरणेमध्ये रूपांतरित करण्याच्या विहान.एआय (Vihaan.AI) परिवर्तनाच्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. एअर इंडियाने पूर्वी वापरलेल्या भारतीय पद्धतीच्या खिडकीच्या खास प्रतिष्ठित आकाराला ब्रॅंडच्या नवीन लुकमध्ये सोन्याच्या खिडकीच्या चौकटीच्या रूपात पुनर्कल्पित केले आहे. ब्रॅंडच्या या नवीन ओळखीसाठी डिझाईन केलेली ही खिडकीची चौकट ‘विंडो ऑफ पॉसिबिलिटिज’ चे प्रतीक आहे.


एअरइंडियाचे नवीन लोगो ‘द व्हिस्टा’ हे सोनेरी खिडकीच्या चौकटीच्या शिखरावरून प्रेरित आहे, जे अमर्याद शक्यता, प्रगतीशीलता आणि एयरलाइनच्या भविष्यातील धाडसी व आत्मविश्वासी दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. एअर इंडियाच्या अगदी नवीन अश्या एयरक्राफ्ट लिव्हरीच्या डिझाईनमध्ये गडद लाल (डीप रेड), वांगी जांभळा (ओबर्जिन) आणि सोनेरी (गोल्ड हायलाइट्स) चे पॅलेट तसेच चक्रापासून प्रेरित असलेले पॅटर्न आहे. एअर इंडियाला प्रिमियम, सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध असणारे असे स्थान देण्यासाठी आपुलकीसह एक आत्मविश्वास दर्शवणारे नवीन खास बनवलेले ‘एअर इंडिया सॅन्स’ फॉन्टला हे नवीन लुक अभिमानाने मिरवते.


एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “आमचा हा परिवर्तनात्मक नवीन ब्रॅंड एअर इंडियाला जगभरातील पाहुण्यांना सेवा देणारी एक जागतिक दर्जाची एयरलाइन बनवण्याची आणि जागतिक पटलावर अभिमानाने एक नवीन भारत दाखवण्याची महत्त्वकांक्षा प्रतिबिंबित करतो. नवीन एअर इंडिया धाडसी, आत्मविश्वासू आणि चैतन्यपूर्ण तर तसेच आपुलकी असलेले तर आहेच पण त्याच बरोबर ते आपल्या अशा समृद्ध इतिहास व परंपरांबरोबर दृढपणे बांधलेले आहे ज्या सेवाक्षेत्रातील मानकांसाठी भारतीय आदरातिथ्याला एक जागतिक प्रमाण बनवतात.”


ब्रॅंडचे परिवर्तन करणारी कंपनी ‘फ्यूचरब्रॅंड (FutureBrand)’ सोबत भागीदारीने डिझाईन केलेली ही खास प्रतिष्ठित अशी नवीन ब्रॅंड ओळख एअर इंडियाच्या गौरवशाली इतिहासाला आणि भविष्यामध्ये सर्वोत्कृष्टता, कल्पकता, नावीन्य आणण्याच्या त्याच्या ध्यासाला एकत्रित करते. तसेच ‘मनाने भारतीय असलेली एक उच्च दर्जाची जागतिक एयरलाइन’ अशी कंपनीची अनोखी ओळख ही नवीन डिझाईन निर्माण करते.


डिसेंबर २०२३ मध्ये जेव्हा एअर इंडियाचे पहिले एयरबस ए३५० (AirBus A350) नवीन लिव्हरीच्या ताफ्यात दाखल होईल तेव्हापासून प्रवाश्यांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात नवीन लोगो पाहता येईल.


कॅम्पबेल विल्सन पुढे म्हणाले, “रंग, पॅटर्न, आकार व ते सर्व कशा पद्धतीने एकत्रित बांधले आहेत आणि ते काय प्रतिबिंबित करतात हे सर्व महत्त्वाचे आहेच मात्र आपले काम हे अधिक बोलत असते. आम्ही भारताच्या प्रमुख एयरलाइनच्या भूमिकेला पुनर्कल्पित करण्यासाठी संपूर्ण परिवर्तनाच्या प्रवासाच्या मध्यभागी आहोत.”


एअर इंडिया आपल्या सेवेला अजून जास्त उंचावण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी आणि भारताच्या अंतर्गत, भारतातून आणि भारताकडे प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठी सर्वात लोकप्रिय विमान वाहतूक सेवा बनायला आपली स्थिती मजबूत करण्यासाठी प्रवाश्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुभवांसाठी या कंपनीच्या परिवर्तनाच्या काळात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!