बोगस बिलाद्वारे पाटबंधारे खात्यात लाटले लाखो रुपये?
सातारा (महेश पवार) :
सातारा पाटबंधारे विभाग या ना त्या कारणाने चांगलेच चर्चेत आहे, पाटबंधारे विभागाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने बोगस मेडिकल बिल बनवून दस्तुरखुद्द सिव्हिल सर्जनचे बनावट शिक्के, सह्या करून खोटी बिले तयार केल्याची दबक्या आवाजातील चर्चा शासकीय रूग्णालय आणि पाटबंधारे विभागात सुरू आहे.
या प्रकरणी सातारा पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. राजकीय वरदहस्त असल्याने हे प्रकरणही दडपले जाण्याची शक्यता चर्चेत वर्तवली जातेय.
अधिकाऱ्यांवर तक्रार देऊनही यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची माहिती चर्चेत असून यात एका राजकीय व्यक्ती मार्फत दबाव टाकून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरू असल्याची पाटबंधारे विभागात जोरदार चर्चा सुरू आहे. या खळबळजनक घटना उघडकीस आल्या नंतर अनेकांना घाम फुटला असून उलट सुलट चर्चा आहे. संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का हे प्रकरणही दडपून टाकणार हे काळच ठरेल ?