‘पुढच्या पाच वर्षात दिसणार नाही शेतकरी?’
सातारा :
तालुक्यातील परळी खोऱ्यातील प्रसिद्ध असलेल्या ठोसेघर परिसरातील शेतकरीच दिसणार नाहीत. आणि पुढच्या पाच वर्षात सगळी शेती पडीक होऊ शकते, अशी हतबुद्ध करणारी प्रतिक्रिया येथील स्थानिक शेतकरी कोंडीबा बेडेकर यांनी राष्ट्रमतकडे व्यक्त केली. ते काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दांत…
ठोसेघर परिसरात पुर्वी रात्री गवे दिसत नव्हते , मात्र आता फिरलं तर रस्त्यावर गवे पाहायला मिळतात . जंगलात गवत नसल्यामुळे त्यांचे पोट भरत नाही यामुळे गवे गावापर्यंत पोहोचले, खरंतर जंगल वाढलं पण या जंगलामुळे येणार गवत वाढायचं कमी झालं कोयनेच्या खोऱ्यात असणारी 350 गाव उठल्यामुळे आणि त्या ठिकाणी धरण झाल्यामुळे शेती नाहीशी झाली यामुळे कोयनेच्या खोऱ्यातली जंगली जनावरे (गवे , डुक्कर,माकड) घाटमाथ्यावरील भागात पोहोचली , आणि शेतीचे नुकसान करायला लागलीत . यामुळे शेतकऱ्यांना इतका त्रास होतोय ,की काही दिवसांनी इथला शेतकरी शेती पण करणार नाही , इथं येणाऱ्या काळात शेतकरी राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या परिसरात युवकांना शेती करायचं म्हटलं तर अवघड झाले यामुळे शासनाने खरंतर लक्ष घालणं गरजेचं आहे शेती होत नाही म्हणून जनावर पाळली तर वन विभाग चारू देत नाही येऊ देत नाही , मग वनविभागाने त्यांची जनावर आमच्याकडे पण येऊ नये म्हणून काहीतरी करावं , वनविभागाने लाखो रुपये खर्च करून इतकी तळी खोदली , पण शासनाचेच नुकसान झालं एकाही तळ्यात पाणी नाही.यामुळे पाण्याच्या शोधात गावापर्यंत पोहोचतात आणि शेतीचे नुकसान करतात.
मी डायमंड कंपनीत 20 हजाराची नोकरी करत होतो , ती सोडली आणि शेतीची आवड असल्याने शेती करू लागलो , पण आता शेतीतून काहीच मिळेना, आता अशी अवस्था आहे की शेती असून पण ती करू शकत नाही आणि जर केली तर जंगली जनावरे नुकसान करतात ,पण शासनाकडून भरपाई मिळत नाही आणि जर मिळाली तर खर्च दहा हजार आणि भरपाई हजार यामुळे शेतकरी अडचणीत आलाय , शासनाकडून मिळणाऱ्या पैशातून खतांचाही खर्च भागत नाही , यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.यामुळे भविष्यात जंगली प्राण्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे अन्यथा या परिसरात भविष्यात एकही शेतकरी दिसणार नाही . असे इथला शेतकरी बोलू लागला आहे यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.