google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

चोरलेला सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; आता ‘त्या’ भंगारवाल्यांवरही कारवाई कधी?

सातारा (महेश पवार) :

शहरालगत असणाऱ्या एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या परंतु एमआयडीसीमध्ये होणारी वारंवार चोरी यामुळे अनेक कंपन्यांनी साताऱ्यातून काढता पाय घेतला आहे. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये भंगारवाले दादा फोफावले आहेत. भंगारवाले दादा यांचे कनेक्शन नेहमीच आसपास असणाऱ्या राजकीय आणि शासकीय अधिकारी यांच्यासोबत असल्यानेच मोठमोठ्या चोऱ्या आणि या चोरी मधील माल खरेदी करणारे यांचे जणू काही थैमानच आहे की काय? अशी परिस्थिती आहे.

त्यामध्ये अनेक चोरीचे माल खरेदी करणारे व्यावसायिक यांच्यावर आज अखेर नाममात्रच कारवाई झाली आहे त्यांचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असतानाही त्यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जात नाही अशातच नवीन कारभारी आल्यानंतर किमान एका भंगार दुकानदारावर कारवाई झाली आहे परंतु एमआयडीसी मधून आंदेकर यांच्याकडे विक्रीला जाण्यापूर्वी एमआयडीसीमध्ये असणाऱ्या एका लोकप्रिय भंगार विक्रेत्याकडे हा माल विकला असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

त्यामुळे झालेल्या कारवाई मध्ये त्या भंगार व्यवसायिकाचे नाव कुठेही आले नाही आणि या लोकप्रिय भंगार व्यवसायिकावर पोलीस प्रशासन कारवाई करणार की त्याला नेहमीप्रमाणे अभय देणार! असा सवाल केला जात आहे.

सातारा शहरा लगत असणाऱ्या एमआयडीसीमध्ये वेदांत इलेक्ट्रिकल कॉर्पोरेशन विपूल एंटरप्राईजेस या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीचा प्रकार घडला होता घडलेला प्रकार गंभीर असल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना, अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले होते.

दि २४/५/२०२३ रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे व तांत्रिक विश्लेषनाद्वारे एम. आय. डी. सी. सातारा येथील वेदांत इलेक्ट्रीकल कार्पोरेशन, विपूल इंटरप्रायजेस येथे घडलेला तांबा तार चोरीचा गुन्हा महिला आरोपींनी मिळून केला आहे अशी बातमी मिळाल्याने अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी सदरची माहिती पोउनि अमित पाटील व पथकास सांगून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोउनि अमित पाटील यांनी पथकातील महिला / पुरुष अंमलदार यांच्या मदतीने ६ महिला आरोपींना गुन्हयाच्या तपासकामी ताब्यात घेवून त्यांच्याकडे कौशल्याने तपास करुन त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न केले. त्यांनी सदर चोरीतील तांब्याच्या तारा ज्या दुकानदारास
विकल्या होत्या प्रमोद किसन आंदेकर राहणार करंजे सातारा याच्याकडून८८८ किलो वजनाच्या ५, ७७,२००/- रुपये किंमतीच्या तांब्याच्या धातूच्या विटा हस्तगत करुन सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ४०७ / २०२३ भादंवि कलम ३८०, ४१९, ३४ हा गुन्हा उघड केला.


तसेच सदर महिला आरोपी यांनी सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ३२१ / २०२३ भादंवि कलम ४६१ हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न करुन त्या गुन्हयातील चोरीस गेलेल्या ३०,००० /- रुपये किंमतीच्या एकुण ११ बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत. असे एकुण २ चोरीचे गुन्हे उघड करुन एकुण ६,०७, २०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहा महिला संशयित आरोपी यांच्यासह दुकानदारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाईमध्ये समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि, संतोष पवार, रविंद्र भोरे, विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ,
संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, गणेश कापरे, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, मोना निकम, शकुंतला सणस, अनुराधा सणस, तृप्ती मोहिते, दिपाली नामदेव यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे असे असताना सुद्धां भंगार चोरी प्रकरणातील भंगार माफिया असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणार की हा विषय याच चोरी पुरता मर्यादित राहणार हा मात्र एमआयडीसी साठी महत्त्वाचा प्रश्न झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!