google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

उरमोडी जलसिंचनचे विक्रमबाबा कदम यांच्या हस्ते पाणी पूजन

पुसेसावळी (प्रतिनिधी) :


उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी दुष्काळी भागातील खटाव माण भागातील गावांना वर्षभर मिळावे व पावसामुळे अतिरिक्त झालेल्या पाणीसाठा आत्ताच दुष्काळी भागात वळवून उन्हाळ्यात कोरडे पडणारे तलाव बंधारे भरावेत अशी मागणी कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेते व वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम, वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विक्रमबाबा कदम यांनी श्रीमंत छ.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे काही दिवसापूर्वी केली होती याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा केला त्यानुसार उपमुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला आदेश देऊन हे पाणी तातडीने सोडण्याबाबत सूचना केल्या होत्या याची कारवाई त्वरित ८ दिवसात झाली असून उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी वडी येथे पूजन करण्यात आले.

उरमोडी धरणातून अतिरिक्त वाया जाणारे पाणी खटाव-माण तालुक्यामधील येरळवाडी,येळीव,पारगाव, भूषणगड,म्हासुर्णे, होळीचागाव,चोराडे,शिरसवडी,वांझोळी,शेनवडी येथील पाझर तलाव तसेच उरमोडी लाभक्षेत्रात समाविष्ट असणाऱ्या सर्व गावांतील ओढे,नाले भरून घेण्यासाठी सोडण्यात आले आहे याचा फायदा येत्या उन्हाळ्यात दुष्काळी जनतेला होणार आहे आज या पाणी आवर्तनाचा पाणीपूजन सोहळा मौजे-वडी ता.खटाव येथे वर्धन ऍग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम,सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, युवा नेते महेश पाटील,वडीच्या सरपंच वैशाली प्रकाश मोहिते,कळंबी चे उपसरपंच सतीश काळे, गोरेगावचे सरपंच नाना जाधव, वडगाव सोसायटी चेअरमन अनिल पवार,अमोल कदम, राजू कदम,धनंजय पाटील वसंत बापू यादव,अमीर मुलाणी,दिलीप यादव आदि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बोलताना विक्रमबाबा म्हणाले दुष्काळी जनतेची गरज लक्षात घेऊन धैर्यशीदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेल्या प्रयत्नानुसार उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घालून प्रशासनास सूचना दिल्या आ.जयकुमार गोरे आणि आ.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला उरमोडी जलसिंचन विभागाचे अधिकारी शिल्पा राजे मॅडम, माधव सटाले, डी.बी.गुळीग आदि अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली त्यामुळे आज आपल्या दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे ऐन उन्हाळ्यात आपणास पाणी टंचाई जाणवणार नाही हजारो एकर जमिनीला याचा फायदा होणार असून पुसेसावळी व औंध परिसरातील शेतकऱ्याना मोठा दिलासा मिळाला आहे.

याप्रसंगी अनिल पिसाळ,कालिदास यादव,राजू माळवे,दिनकरशेठ फाटक, महेश घार्गे,इस्माईल संदे, अक्षय घाटगे,सुरज पवार,भरत सूर्यवंशी, अक्षय पवार,रणजीत मोहिते,संदीप काळे,आनंदराव कदम,अमित जाधव,सिद्धेश्वर कदम यांचेसह गावोगावचे शेतकरी, ग्रामस्थ,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!