google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘जमीन हडप प्रकरणांची चौकशी करण्यास एसआयटीला मोकळा हात द्या’

पणजी :

आपल्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांकडुन होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे असुरक्षित वाटू लागलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी प्रत्येक संधीचा वापर करत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी सध्या सुरू असलेल्या जमीन बळकावण्याच्या तपासात हस्तक्षेप करणे थांबवावे आणि विशेष तपास पथकाला मोकळे हात द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

मी 25 जून 2022 रोजी बेकायदेशीर जमीन बळकावण्यामध्ये विद्यमान कॅबिनेट मंत्र्याच्या सहभागाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते आणि एसआयटीला मुक्त आणि निष्पक्षपणे काम करण्यास परवानगी देण्यासाठी त्या मंत्र्याला वगळण्याची मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यानी त्यावर डोळेझाक केली असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

माझ्या पहिल्या इशाऱ्यानंतरही मुख्यमंत्री कोणतीही पावले उचलण्यात अयशस्वी ठरल्याने मी 4 ऑगस्ट रोजी पुन्हा दुसरा इशारा केला आणि एकतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याचा सहभाग नसल्याची घोषणा करावी किंवा त्या मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर मी त्या भ्रष्ट मंत्र्यांचा पर्दाफाश करेन, असेही मी म्हटले होते. माझ्या दुसऱ्या इशाऱ्यानंरर सुद्धा डॉ.प्रमोद सावंत अजूनही जागे झालेले नाहीत, असे गिरीश चोडणकर म्हणाले.

आपली खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री आपल्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी एसआयटी तपासाचा वापर करत असल्याची माहिती माझ्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटीला काही प्रकरणांमध्ये संथपणे कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचेही मला कळले आहे. मी लवकरच कागदोपत्री पुराव्यासह मुख्यमंत्र्यांच। पर्दाफाश करेन, असे गिरीश चोडणकर यांनी शेवटी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!