गोवा
”अशा’ स्थितीतील काणकोण रविंद्र भवनचे उद्घाटन नको’
काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर याचा २७ जुलैला वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांधकाम सुरु असलेल्या अर्धवट स्थितीतील काणकोण रविंद्र भवनचे उदघाटन करू नये असा इशारा स्थानिक काँग्रेस नेते जनार्दन भंडारी यानी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांना दिला आहे.
आज कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप ,साधन सुविधा विकास महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक हरीश हडकोणकर यानी काणकोणच्या रविंद्र भवनाला भेट दिल्यावेळी जनार्दन भंडारी यानी सुद्धा रविंद्र भवनाच्या कामाची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी सादर मागणी वेळीप यांच्याकडे केली.
व्यवस्थापकीय संचालक हरीश हडकोणकर यानी काणकोणच्या रविंद्र भवनाला भेट दिल्यावेळी जनार्दन भंडारी यानी सुद्धा रविंद्र भवनाच्या कामाची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी सादर मागणी वेळीप यांच्याकडे केली.