google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘गोवा मुक्ती हा या भूमीसाठी पुर्नजन्माचा क्षण’

Goa Liberation Day: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 62 व्या गोवा मुक्ती दिनाच्या गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या. या दिनानिमित्त दोन्ही नेत्यांनी राज्याला उद्देशून संदेशही दिला आहे. त्यात राज्यपालांनी गोवा मुक्ती हा पुर्नजन्माचा क्षण असल्याचे म्हटले आहे.


राज्यपाल पिल्लई म्हणाले की, शतकानुशतकांचे पोर्तुगीजांचे वर्चस्व संपुष्टात आणताना गोव्यातील लोकांनी, अतुट धैर्य आणि दृढनिश्चयाने, त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवले.


गोव्याची मुक्ती हा त्या भूमीसाठी पुनर्जन्माचा क्षण होता. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया.


दरम्यान, राज्य सरकारच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ या उपक्रमातून राज्याच्या प्रगतीसाठी गोवावासीयांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. ते म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून प्रगतीचे ध्येय साध्य करण्यासाठी कूच करूया. सर्व क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा समर्पित करूया.


आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या भावी पिढ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी कठोर संघर्ष केला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. दीर्घकाळ चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य आणि योगदान याचे आज आम्ही अभिमानाने स्मरण करतो आहोत.


दरम्यान, गोवा मुक्ती दिनानिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही गोमतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्यामुळे 1961 साली गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.


कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा आत्मा जपण्याचा आणि गोव्याची संस्कृती आणि वारशाचे रक्षण करण्याची शपथ घेऊया, असे राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!