google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

शिवेंद्रराजेंच्या विजयासाठी उदयनराजेंनी कंबर कसली…

सातारा :

सातारा- जावली मतदारसंघात शिवेंद्रराजेंनी विकासाचा झंजावात सुरु ठेवला आहे. सर्वप्रकारची विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. आम्ही दोघेही तुम्हाला सोडून कुठेही गेलो नाही आणि जाणारही नाही. आयुष्यभर तुमच्या सोबतच राहणार आहोत. मला खात्री आहे, तुमच्या साथीमुळे शिवेंद्रराजे महाराष्ट्रात १ नंबरचे मताधिक्य मिळवतील. काहीही झालं तरी शिवेंद्रराजे कालही आमदार होते, आजही आहेत आणि उद्याही तेच आमदार होतील, असे प्रतिपादन खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.


शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहर आणि सातारा तालुक्याचा संयुक्त विराट मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, भाजप लोकसभा संयोजक सुनील काटकर, विधानसभा संयोजक अविनाश कदम, प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, प्रतीक कदम, वनिता गोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, राहुल शिंदे, धर्मराज घोरपडे, मिलिंद कदम, गीतांजली कदम, सातारा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अशोक मोने, निशांत पाटील, रंजना रावत, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, विक्रम पवार, शंकर माळवदे, प्रकाश बडेकर, दत्ता बनकर, जयवंत भोसले, दीपलक्ष्मी नाईक, सिद्धी पवार, आशा पंडित, सुनीशा शहा, रेणू येळगावकर, अरुण बंडगर, शेखर मोरे पाटील, लीना गोरे, मनीषा काळोखे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजेंद्र लवंगारे, शशिकांत वाईकर, शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत जाधव, निलेश शिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.


खा. उदयनराजे म्हणाले, आम्ही दोघेही कोणताही स्वार्थ न ठेवता जनतेची सेवा करत आलो आहोत. तुमच्यामुळे आम्ही आहोत, याची जाणीव आम्ही कायम ठेवत आलो आहोत. महायुती सरकारने केलेली विकासकामे, योजना वाखाणण्याजोग्या आहेत. जगात अनेक राजघराणी झाली. आम्ही छत्रपतींच्या समाजसेवेचा वारसा कायम चालवत आलो. शिवेंद्रराजेंसारखा उमदा चेहरा तुमच्यासमोर आहे. जात- पात असा भेदभाव न मानता सर्वधर्म समभाव या न्यायाने आम्ही काम करतो. दोघेही कुठेही कमी पडणार नाही. अहोरात्र कधीही हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहोत. शिवेंद्रराजेंना विक्रमी मतांनी विजयी करून एक वेगळा इतिहास घडवा, असे आवाहन खा. उदयनराजे यांनी केले.


आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नेमकं काम कोण करतंय त्याच्याच पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. महायुती सरकारने तुम्हाला भरभरून दिले आहे. आता सर्व लाडक्या बहिणी आणि जनतेने महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. मतदारसंघात सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. काँग्रेसने आजवर रखडवलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच सोडवू शकतात. स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा कारखाना उभा केला, उरमोडी धरण बांधले. त्याचा फायदा सातारा तालुक्याला झाला आहे. विकासाची गंगा अशीच प्रवाहित ठेवण्यासाठी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केले.


सुनील काटकर, भाजपचे महामंत्री विठ्ठल बलशेटवार, राजेंद्र लवंगारे, आरपीआय जोगेंद्र कवाडे गटाचे युवराज कांबळे, डी. जी. बनकर, समृद्धी जाधव आदींनी मनोगत व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजेंना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

संतोष कणसे यांनी सूत्रसंचालन, राजू भोसले यांनी प्रास्ताविक केले. अजिंक्यतारा कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत यांनी आभार मानले. मेळाव्याला कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, चंदन घोडके, उत्तमराव नावडकर, सर्जेराव सावंत, व्यंकटराव मोरे, प्रभाकर साळुंखे, बाळासाहेब गोसावी, प्रकाश गवळी, चंद्रकांत जाधव, भिकू अण्णा भोसले, धनंजय जांभळे, बाळासाहेब खंदारे, अमित भिसे, रामभाऊ जगदाळे, रयतक्रांती संघटनेचे मधुकर जाधव, रवी पवार यांच्यासह सातारा शहर, सातारा तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व आजी- माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी- माजी सदस्य, विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!