‘…आता ‘कॅग’लाही अज्ञानी म्हणणार का?’
पणजी:
विश्वजित राणे यांनी महालेखापालाला (कॅग) अज्ञानी म्हणण्याचे धाडस करेल काय आणि कॅगला चर्चेला आवहान देतील काय असा प्रश्न कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरोग्य मंत्री गिरीश चोडणकर यांना केला आहे. गोमेकॉतील ऑषधे खरेदी प्रकरणात कॅगने घेतलेल्या दखलीच्या पार्श्वभुमीवर चोडणकर यांनी हा प्रश्न केला आहे.
औषधे खरेदी प्रकरणातील महाघोटाळा कॉंग्रेस पक्षाने १-२-२०२० मध्येच उघडकीस आणला होता आणि या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी आरोग्य मंत्री राणे यांनी स्वत:चा बचाव करताना अशिक्षित, अज्ञानी असे संबोधले होते. आता कॅगने आमच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे कॅगलाही आरोग्यमंत्री अज्ञानी व अशिक्षित संबोधणार का असा युक्तीवाद चोडणकर यांनी केला आहे.
आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री राणे या संबंधी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या औषध घोटाळा प्रकरणात कारवाईचे आदेश देऊन त्यांची ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ ही घोषणा सार्थ करावी अशी मागणीही चोडणकर यांनी केली आहे.