पणजी:
चर्चिलकन्या वालंका आलेमा यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीवर निवड झाली आहे. भारतीय फुटबॉल महासंघाच्या 85 वर्षांच्या इतिहासात निवडून आलेल्या वालंका या पहिल्या महिला ठरल्या आहेत. एका महिलेसाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीत प्रवेश मिळवणे पुरुषांपेक्षा अधिक कठीण असल्याचे वालंका यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर भारतीय फुटबॉल महासंघांची निवडणूक शुक्रवारी नवी दिल्ली येथे झाली.यावेळी महासंघाच्याअध्यक्षपदी कल्याण चौबे यांची निवड झाली आहे.या निवडणुकीत 34 राज्य संघटनांनी मतदान केले आहे. यापैकी 33 मते कल्याण चौबे यांना मिळाली आहेत. तर माजी भारतीय फुटबॉलपट्टू बायचुंग भुतिया यांना केवळ एक मत मिळाले आहे.
एक गोमंतकिय म्हणून मला महासंघात निवड झाल्याचा मला अभिमान आहे. गोवा हा भारतीय फुटबॉलसाठी महत्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. गोव्याचे प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांना एक होऊन काम करणे गरजेने असल्याचे ही त्यावेळी बोलताना म्हणाल्या.