google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

चापोलीतील पती-पत्नीचा अपघाती मृत्यू…

काणकोण:

दक्षिण गोव्यात काणकोण तालुक्यातील गुळे येथे एक भीषण अपघात घडला आहे. व्होल्वो बसने दुचाकीला ठोकरल्याने या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा करूण अंत झाला आहे. आज, मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला.

हे दाम्पत्य चापोली येथील आहे. मंगळवारी सकाळी ते दुचाकीवरून चावडी येथे जात होते. यावेळी मडगाव-कारवार रस्त्यावर गुळे येथे या आंतरराज्य प्रवासी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. व्होल्वो बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेली महिला गाडीवरून खाली पडली.

बसचे चाक तिच्या अंगावरून गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या पतीला गंभीर जखमी अवस्थेत असताना त्याला काणकोण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्याचेही निधन झाले. ही इंटरसिटी बस मडगावच्या दिशेने जात होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!