गोवा
काँग्रेसमधून ‘या’ पाच नेत्यांचे निलंबन…
पणजी :
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत गोवा काँग्रेसमधील पाच नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही कारवाई केली आहे. या पाच नेत्यांमध्ये प्रदीप नाईक, जनार्दन भंडारी, खेमलो सावंत, महेश म्हांबरे, ग्लेन काब्राल अशी या नेत्यांची नावे आहेत.
30 जून 2023 रोजी ही कारवाई केली गेली आहे. या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे म्हटले आहे. त्यांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे.