पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी 17 फेब्रुवारीपर्यंत तहकूब
महसूलमंत्री संशयित बाबूश मोंसेरात आणि त्यांच्या आमदार पत्नी संशयित जेनिफर मोंसेरात यांचा सहभाग असलेल्या पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी 17 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.
आता ही सुनावणी दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर होणार असून आज सर्व संशयितांची या नव्या न्यायालयात हजेरी होती.
मात्र संशयित मोंसेरात दांपत्यासह माजी आमदार टोनी फर्नांडीस हे आजच्या सुनावणीस गैरहजर राहिले. त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी गैरहजेरीचा अर्ज सादर केला.
या प्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दखल केले असून या सुनावणीला त्यांचे वकिल उपस्थित होते. या प्रकरणी एकूण 37 संशयितांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
त्यांपैकी एका संशयिताने आपला पासपोर्ट नूतनीकरण करण्याचा असल्याने तो न्यायालयाने आपल्याला द्यावा असा अर्ज केला आहे.