
‘सहानुभूतीसाठी “हिक्टिम कार्ड” खेळू नका’
मडगाव :
भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपो कॉंग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांच्या कोणत्या वक्तव्याचा उल्लेख करत आहात? विरियातो फर्नांडिस यांच्या वक्तव्याचा तथाकथित व्हिडिओ तुम्ही वैयक्तिकरित्या पाहिला आहे किंवा त्यांचे वक्तव्य ऐकले आहे का? त्यांनी खरोखरच लिंगभेदाबाबत टिप्पणी केली आहे का ते तुम्ही तपासले आहे का? तुम्ही तुमच्या आरोपांना पुष्टी देणारा त्यांचा ऑडिओ किंवा व्हिडिओ पोस्ट करू शकता का? असा सवाल काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक शमिला सिद्दीकी यांनी पल्लवी धेंपेंना केला आहे.
एक्स समाजमाध्यमावर भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक शमिला सिद्दीकी यांनी पल्लवी धेंपेंना “व्हिक्टीम कार्ड” खेळून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले आहे.
आज जगात प्रत्येकजण महिला सक्षमीकरण आणि समान हक्कांवर बोलत असताना तुम्ही “जेंडर बायस” का आणण्याचा प्रयत्न करत आहात? काँग्रेसचे लोकसभा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भाजप सरकारच्या काळात वाढती महागाई आणि बेरोजगारीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांना भाजपच्या लोकसभा उमेदवार म्हणून पल्लवी धेंपेंनी उत्तर देण्याची जबाबदारी आहे. जेंडर बायस म्हणून पल्लवी धेंपें मुख्य मुद्यांवरुन लक्ष दुसरीकडे वळवू शकत नाही, असे शमिला सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी महागाई आणि बेरोजगारीचे मुख्य मुद्दे उपस्थित केले तेव्हा पल्लवी धेंपे अडचणीत आल्या. संपूर्ण गोव्याला माहीत आहे की, पल्लवी धेंपे यांनी यापूर्वी एकदाही सदर मुद्द्यांवर एक शब्दही उच्चारला नाही, असा दावा शमिला सिद्दीकी यांनी केला.
समाजसेवा निस्वार्थ भावनेने केली जाते. एखाद्याने समाजसेवा केली म्हणून श्रेय घेऊ नये किंवा मत मागू नये. मी पुन्हा एकदा पल्लवी धेंपेनां सकारात्मक प्रचाराचा अवलंब करण्याची विनंती करते, असे शमिला सिद्दीकी म्हणाल्या.
भाजप उमेदवार पल्लवी धेंपेंचे सोशल मीडिया भाजप ट्रोल आर्मीने हाताळत असण्याची शक्यता आहे. कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी पल्लवी धेंपेंनी वस्तुस्थिती पडताळून पाहावी. केवळ “महिला कार्ड” वापरुन तिला सहानुभूती मिळवता येणार नाही. माझ्यासारख्या महिला जनतेला भेडसावणाऱ्या मुद्यांवर त्यांना प्रश्न करत राहतील, असे शमिला सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
…