National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी मणिपूरमधील 16 वर्षीय ट्रायथलीटचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच जेलीफिशने दंश झाल्याने दोन स्पर्धेक मंगळवारी जखमी झाले. खेळाडूंना मिरामार येथे तैनात असलेल्या दृष्टी जीवरक्षकांनी प्रथमोपचार केले.
मिरामार समुद्रकिनारी मिश्र रिले स्पर्धेत मणिपूर ट्रायथलीटचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. यावेळी येथे तैनात असलेल्या दृष्टी जीवरक्षक पूजा बुडे, पुनू वेळीप, हितेश गावडे आणि स्वयंसेवक रमेश गंताली आणि उज्ज्वल प्रसाद हे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात होते.
दृष्टीच्या जीवरक्षक आणि स्वयंसेवक जखमी ऍथलीटच्या मदतीसाठी धावले आणि त्याला समुद्रकिनार्यावर उभ्या असलेल्या दृष्टी मरीन जीपमध्ये नेण्यापूर्वी त्याला स्पाइन बोर्डवर ठेऊन वैद्यकीय मदत केली.
पुढील उपचारासाठी त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.