
Corona Update : गोव्यात 10 नव्या कोरोना बाधितांची नोंद…
Goa Corona Update: देशात विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत गोव्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, (Corona Update) मागील 24 तासांत 222 प्रयोगशाळा नमूने तपासण्यात आले आहेत.
गोव्यात काही दिवसांपूर्वी जेएन 01 व्हेरिएंटचे 19 रुग्ण आढळून आले होते. केरळनंतर गोव्यात आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, सर्व रुग्ण ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले होते.
दरम्यान, राज्यात पुन्हा कोरोना डोकं वर काढताना दिसत आहे. राज्यात सध्याच्या घडील 32 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 98.46 टक्के एवढा आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने पाहटे प्रसिद्ध केलेल्या (Corona Update) आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोविड-19 ची 752 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,420 वर पोहोचली आहे. शुक्रवारच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे.
21 मे 2023 नंतर प्रथमच देशात एकाच दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे.