google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

Congressमध्ये मोठे फेरबदल ; गिरीश चोडणकर यांच्यावर ‘या’ राज्याची जबाबदारी…

२०२४ साली देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये  ( Congress) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडे  त्रिपूरा, सिक्किम, नागालँड, मणिपूर या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, तेलंगणातील विजयानंतर माणिकराव ठाकरे यांच्यावरही गोव्यासह, दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेलीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस (congress) नेत्या प्रियंका गांधी यांच्याजागी अविनाश पांडे यांना प्रभारी बनवण्यात आलं आहे. सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी करण्यात आलं आहे. जयराम रमेश यांच्याकडे माध्यमविभाग आणि के.सी वेणुगोपाल यांच्यावर पुन्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय माकन पक्षाचे खजिनदार तर मिलिंद देवरा आणि इंदर सिंघला हे सह खजिनदार असतील.

Congressने कुणाकडे कुठल्या राज्याची जबाबदारी दिली ?

गिरीश राय चोडणकर – त्रिपूरा, सिक्किम, नागालँड, मणिपूर
मुकूल वासनिक – गुजरात
जितेंद्र सिंग – आसाम आणि मध्य प्रदेश
रणदीप सिंग सुरजेवाला – कर्नाटक
कुमारी सेजला – उत्तराखंड
जी. ए. मीर – झारखंड आणि पश्चिम बंगाल
दीपा दासमुंशी – केरळा, लक्षद्वीप आणि तेलंगणा
डॉ. ए. चेल्लाकुमार – मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश
अजोय कुमार – ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी
भरतसिंह सोलंकी – जम्मू-काश्मीर
राजीव शुक्ला – हिमाचल प्रदेश आणि चंदीगड
सुखजिंदर सिंग रंधावा – राजस्थान
देवेंद्र यादव – पंजाब
मनिकम टागोर – आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!