google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

‘इंडिया’ आघाडीबद्दल ममता दिदींचा मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केली आहे. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये एकट्यानं निवडणुका लढणार असल्याचं ममता बॅनर्जींनी घोषित केलं आहे.

“माझी काँग्रेस पक्षाशी कुठल्याही प्रकारे चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लोकसभा निवडणूक लढू, असं मी नेहमीच सांगितलं होतं. देशात काय होईल, याची काळजी मी करत नाही. पण, आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. बंगालमध्ये आम्ही एकटे लढू आणि भाजपाचा पराभव करू,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पश्चिम बंगालमधून जाणार आहे. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी ‘इंडिया’ आघाडीची एक सदस्य आहे. राहुल गांधींनी न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे. पण, याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही.”

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने तृणमूल काँग्रेससकडे १० ते १२ जागांची मागणी केली होती. पण, तृणमूलने काँग्रेसला फक्त २ जागा दिल्या होता. यानंतर पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती. “ममता बॅनर्जींच्या दयेवर निवडणुका लढवल्या जाणार नाहीत. ममता बॅनर्जी ज्या दोन जागा सोडण्यास तयार आहे, तिथे काँग्रेसने भाजपा आणि तृणमूलचा पराभव केला आहे. निवडणूक कशी लढवायची, हे काँग्रेसला माहिती आहे,” असा हल्लाबोल अधीर रंजन चौधरींनी ममता बॅनर्जींवर केला होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!