google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

खराब हवामानामुळे कोलमडले विमान उड्डाणांचे वेळापत्रक

गोव्यातील शहरी भागात जरी थंडी काहीशी कमी प्रमाणात असली तरी ग्रामीण भागात थंडीची तीव्रता जाणवत आहे. तसेच थंडी सोबतच दाट धुकं पडत असून याचा फटका काल दाबोलीतील विमान सेवेला बसला.

दाबोळी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दाट धुक्यामुळे येथील विमान उड्डाणांचे वेळापत्रकही कोलमडले. एअरलाइन्सने आगमन आणि निर्गमनांच्या वेळापत्रकात बदल केल्याने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या बऱ्याच प्रवाशांचा खोळंबा झाला.

खराब हवामानामुळे सकाळ सत्रातील उड्डाणे मुंबई, बेंगळुरू आणि कन्नूरकडे वळवण्यात आल्याने अनेक प्रवाशांना विमानतळावर जवळपास चार तास थांबावे लागले. सकाळी 6.10 चे मुंबईहून गोव्याकडे निघालेले इंडिगोचे 5E5202 फ्लाइट खराब हवामानामुळे परत मुंबईकडे वळवण्यात आले. त्याचप्रमाणे, मुंबईहून सकाळी 6.10 चे GoFirst फ्लाइट परत मुंबईकडे वळवण्यात आले.

 

एअर एशियाचे बेंगळुरूहून सकाळी 6.45 वाजताचे उड्डाण देखील माघारी वळवण्यात आले. इंडिगोचे सकाळी 6.50 वाजता कोचीनहून आलेले फ्लाइट कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले. या उड्डाणांव्यतिरिक्त नऊ उड्डाणांना उशीर झाला.

खराब दृश्यमानतेमुळे कामकाजात अडथळे येत असल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई आणि बेंगळुरूकडे वळवण्यात आलेली उड्डाणे दुपारनंतर गोव्यात दाखल झाली.

सकाळी 6.20 वाजता मुंबईहून गोव्याला जाणारे एअर इंडियाचे विमान A1685 देखील मुंबईकडे वळवण्यात आले. तसेच सकाळी 6.50 वाजता निघाणारे परतीचे फ्लाइटने सकाळी 11 च्या सुमारास उड्डाण केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!