google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

मडगावात ‘या’ ठिकाणी लवकरच होणार वैद्यकीय महाविद्यालय

पणजी: दक्षिण गोव्यातील आरोग्य सुविधांमध्ये लवकरच मोलाची भर पडणार आहे. मडगाव येथील कामगार विमा योजना इस्पितळाचे रूपांतर केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रालयाने वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी विचाराधीन स्थळांच्या यादीत मडगावातील या इस्पितळाचा समावेश केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण गोव्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या
गोव्यातील बहुतांश वैद्यकीय शिक्षण संस्था आणि उच्च दर्जाची उपचार केंद्रे उत्तर गोव्यात केंद्रित आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यातील रुग्णांना गंभीर आजारांसाठी राजधानी पणजीपर्यंत जावे लागते. अशा परिस्थितीत मडगावमधील या इस्पितळाचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर होणे, ही एक ऐतिहासिक घडामोड ठरणार आहे.

 

या नव्या महाविद्यालयामुळे केवळ उपचार सुविधा नव्हे, तर वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मितीही होणार आहे. स्थानिक युवकांसाठी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य साहाय्यक यांसारख्या व्यावसायिक संधी खुल्या होतील. यामुळे आरोग्य सेवांचा दर्जाही लक्षणीयरीत्या सुधारेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कामगार तथा रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी ईएसआय मडगाव रुग्णालयाचा समावेश नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याच्या विचाराधीन स्थळांच्या यादीत केला. दक्षिण गोव्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यास आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!