
पणजी:
गोवा मनोरंजन संस्था सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग, गोवा दंत महाविध्यालय आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे २०२४ रोजी ६ व्या गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत आहे.तंबाखूच्या वापराचे हानिकारक परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी संदेश देण्यासाठी जाहिरात चित्रपट निवडणे, तोंडाचा कर्करोग आणि हृदयविकाराच्या घटना कमी करणे आणि या चित्रपटांच्या ना-नफा प्रदर्शनाद्वारे चित्रपट कलेचा प्रचार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. गोवा धूरमुक्त करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे.
तंबाखूच्या वापराचे हानिकारक परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी संदेश देण्यासाठी जाहिरात चित्रपट निवडणे, तोंडाचा कर्करोग आणि हृदयविकाराच्या घटना कमी करणे आणि या चित्रपटांच्या ना-नफा प्रदर्शनाद्वारे चित्रपट कलेचा प्रचार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. गोवा धूरमुक्त करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे.हा महोत्सव गोवा विभाग आणि राष्ट्रीय विभाग अशा दोन विभागात होणार आहे.
हा महोत्सव गोवा विभाग आणि राष्ट्रीय विभाग अशा दोन विभागात होणार आहे. “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण” ही या महोत्सवाची संकल्पना आहे.

गोवा विभाग :- जाहिरात चित्रपट. चित्रपट कोकणी, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असले पाहिजेत आणि ते गोव्यातील निर्माते/प्रॉडक्शन हाऊसेस, गोव्यातील व्यक्ती, गोव्यात शिकणारे विद्यार्थी आणि शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनीच तयार केले पाहिजेत. जाहिरात चित्रपट २ मिनिटांपेक्षा जास्त नसावा आणि त्यात इंग्रजी सबटायटल्स असावेत.
राष्ट्रीय विभाग:- जाहिरात चित्रपट. हा चित्रपट फक्त हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावा आणि त्याची निर्मिती केवळ भारतीय निर्माता/प्रॉडक्शन हाऊसेस, व्यक्ती, विद्यार्थी आणि भारतातील शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी केला पाहिजे. जाहिरात चित्रपट २ मिनिटांपेक्षा जास्त नसावा आणि त्यात इंग्रजी सबटायटल्स असावेत.पात्र व्यक्ती १९ एप्रिल २०२४ पर्यंत नोंदणी फॉर्म भरून स्वतःची नोंदणी करू शकतात. या स्पर्धेसाठीचे अर्ज आणि नियम आणि अटी “६ वा गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सव नोंदणी अर्ज” www.esg.co.in वर उपलब्ध आहेत.
पात्र व्यक्ती १९ एप्रिल २०२४ पर्यंत नोंदणी फॉर्म भरून स्वतःची नोंदणी करू शकतात. या स्पर्धेसाठीचे अर्ज आणि नियम आणि अटी “६ वा गोवा तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सव नोंदणी अर्ज” www.esg.co.in वर उपलब्ध आहेत.
सहाय्यक दस्तऐवजांसह चित्रपट प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख १३ मे २०२४ अशी आहे.
गोवा विभागासाठीची बक्षिसे पुढीलप्रमाणे–
पहिले पारितोषिक: रु. ५०,०००/- व्दितीय पारितोषिक: रु. ३०.०००/- तृतीय पारितोषिक: रु. २०,०००/-
राष्ट्रीय विभागासाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे
पहिले पारितोषिक: रु. १,००,०००/- व्दितीय पारितोषिक: रु. ५०,०००/- तृतीय पारितोषिक: रु. ३०,०००/-
पुरस्कार विजेत्या जाहिरात चित्रपटांचा वापर सिनेमा थिएटर/टीव्ही चॅनेल, शाळा, महाविद्यालये आणि इतर सरकारी खात्यांच्या कार्यक्रमांमध्ये आणि इंटरनेटवर तंबाखूविरोधी जाहिरात मोहिमेच्या प्रचारासाठी केला जाईल..
..