google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

”त्या’ लढ्याचा व्हावा अभ्यासक्रमात समावेश’

कुंकळ्ळी :

कुंकळ्ळीतील शुर नागरीकांनी १५ जुलै रोजी उभारलेला लढा हा भारतातील वसाहतवादी शक्तींविरोधातील पहिला लढा होता. सरकारने आता १५ जूलै १५८३ चा लढा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा यासाठी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात खासगी ठराव मांडला आहे.


सभापतीनी सदर ठराव दाखल करुन घेतल्यास सदर उठावाच्या स्मरण दिनीच म्हणजे १५ जूलै रोजी विधानसभेत चर्चेस येणार असुन, देशातील पहिला उठाव तथा असहकार चळवळीचे स्मरण करुन देणार आहे. योगायोगाने १५ जूलै हा दिवस सरकारने गोवा राज्याचा युद्ध स्मारक दिवस म्हणुन घोषीत केला आहे.



कुंकळ्ळीचा लोकप्रतिनीधी म्हणुन दिल्लीतील युद्ध स्मारकाकडे आयोजित सरकारी कार्यक्रमात उपस्थित राहण्याची माजी इच्छा होती, परंतु विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजामुळे मला प्रत्यक्षात तेथे हजर राहणे शक्य होणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर सर्व सहकारी आमदारांनी हा ठराव एकमताने संमत करण्यास पाठींबा द्यावा असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.



पोर्तुगीजांच्या वसाहतवादाविरोधात बंड पुकारलेल्या सर्व हुतात्म्यांना मी अभिवादन करतो. पोर्तुगीजांकडे कर भरण्यास नकार देणारे व असहकार चळवळ उभारणारे स्वाभिमानी कुंकळ्ळीकरांचा मला अभिमान आहे व या ऐतिहासीक मतदारसंघाचे आमदार म्हणुन प्रतिनिधीत्व करण्याचे मला भाग्य लाभल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.



कुंकळ्ळीतील तसेच इतर अनेक स्वातंत्र्यसैनीकांनी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरोधात लढताना आपले सर्वस्व दिले आहे. त्या सर्वांचे स्मरण करणे हे आमचे कर्तव्य आहे. कुंकळ्ळीतील चीफटेन्स मेमोरीयल तसेच इतर स्मारकांची डागडुजी व सौंदर्यीकरणाचे काम त्वरीत हाती घेण्याची मागणी मि करणार आहे. पुरातत्व खात्याकडे वास्तुविशारद हेसिंतो पिंटो यांनी २२ मार्च २०२१ रोजी सादर केलेल्या अहवालावर सरकारने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे यावर विधानसभेत लक्ष ओढणार असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.

आज गोव्यातील अनेक हुतात्मा स्मारके व ऐतिहासीक स्थळे अत्यंत दयनीय स्थितीत असुन, त्यांची तातडीने डागडुजी व देखभाल करणे गरजेचे आहे. गोवा मुक्तीलढ्याशी संबंधीत सर्व स्थळांची यादी करुन ती ऐतिहासीक स्थळे म्हणुन अधिसुचीत करण्याची मागणी मी करणार असल्याचे युरी आलेमाव म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!