विरोध करणारे ‘ते’ चौघे स्वागत रॅलीत ‘जय हो’चा नारा देणार का ?
सातारा (महेश पवार):
महायुतीचे संपूर्ण राज्यातील बहुतांश लोकसभेच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्या मात्र सातारा लोकसभेचा उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झाले नाही साताऱ्यातून भाजप तर्फे उदयनराजे इच्छुक आहेत मात्र तरी देखील त्यांचे नाव जाहीर झाले नाही गेल्या काही दिवसापासून उदयनराजेंच्या उमेदवारी बाबत पक्षातील त्या चार-पाच टग्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना निगेटिव्ह रिपोर्ट पाठवला असल्याची समाज माध्यमांवर चर्चा सुरू आहे.
मात्र उमेदवारी जाहीर होत नसल्याने उदयनराजेंनी थेट दिल्ली घातली आणि वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत उमेदवारी निश्चिती केली असल्याची माहिती समोर येते मात्र भाजपकडून याबाबत अद्याप अधिकृत जरी घोषणा केली नसली तरी उदयनराजेंच्या स्वागतासाठी बुधवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळते दरम्यान उदयनराजेंच्या उमेदवारी बाबत निगेटिव्ह रिपोर्ट पाठवणारे ते आणि स्वतःला अधिकृत सांगणारे चार पाच पदाधिकारी गेले सात दिवस कुठे गायब होते याबाबत उलट सुलट चर्चा साताऱ्यात सुरू आहे.
उदयनराजे जिल्ह्यात प्रवेश करते होतायेत हे कळताच हे चार पाच टगे पदाधिकारी उदयनराजेंच्या स्वागत रॅलीत झेंडा घेऊन नाचायला तयार झाले असल्याची जोरदार खमंग चर्चा आहे. मग उदयनराजेंवर एवढेच प्रेम होते तर पूर्वीपासून पाठिंबा दर्शविला असता तर आज उदयनराजेंच्या स्वागतासाठी उसळलेल्या गर्दीत जय हो चा नारा देत विठ्ठला सांग कोणासाठी झेंडा घेऊ हाती म्हणण्याची वेळ त्या चार टाग्या पदाधिकाऱ्यांवर आली नसती अशी साताऱ्यातील राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.
..