महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेच मोठा भाऊ…
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने त्यांच्या सगळ्या जागा जाहीर केल्या आहेत. माढा आणि उत्तर मुंबई हे दोन मतदारसंघ आणि अनुक्रमे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गेले आहेत. इथले उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मात्र सगळ्या जागा जाहीर झाल्या आहेत. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ ठरली आहे. कारण ४८ पैकी २१ जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, १७ जागा काँग्रेसला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोंगडं भिजत पडलं होतं. अखेर सगळ्या जागा जाहीर झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ जागा जाहीर केल्याने आणि सांगलीची जागा घेतल्याने काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता मविआमध्ये ऑल इज वेल झाल्याचं आजच्या पत्रकार परिषदेतून दिसून येतं आहे.