google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंवरील वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा कुठे गायब झाला?

Kunal Kamra | एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर (Kunal Kamra) राजकीय वादंग उभा राहिला आहे. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कामरा मुंबईहून फरार झाल्याचं वृत्त समोर आलं असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.

कुणाल कामरा याने आपल्या स्टँडअप शोमध्ये महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित एक विडंबनात्मक गाणं सादर केलं. यामध्ये “शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली, एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली” अशी ओळ आणि “ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, आंख पर चष्मा… मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये” असे गाण्याचे बोल होते. जरी शिंदेंचं (Eknath Shinde) नाव थेट घेतलं नसलं तरी रोख स्पष्ट होता, त्यामुळे शिवसैनिक भडकले.


https://youtube.com/shorts/MYYCmLLJRvw?si=Olm6aN2-UZ88BcWB



यानंतर ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये असलेल्या कुणालच्या स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी घुसून तोडफोड केली. यासोबतच शिंदे गटाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विटरवर सकाळी 11 वाजता कामराला चोपण्याची धमकीही दिली. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आणि पोलिसांनी खार व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

काही मीडिया वृत्तानुसार, कामरा रविवारी रात्रीच मुंबई सोडून पाँडिचेरीला रवाना झाला आहे. सध्या तो कुठे आहे याबाबत खात्रीशीर माहिती नसली तरी पोलीस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. शिवसैनिकांच्या आक्रमकतेमुळे त्याने आपली सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबईतून पलायन केल्याचं सांगितलं जातं.


कुणाल कामराच्या या गाण्यामुळे निर्माण झालेला तणाव वाढत चालला आहे. त्याच्याविरोधात राजकीय स्तरावरही संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अधिक चिघळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!