google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी

मुंबई:

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत (shivsena) खळबळ उडाली आहे.

शिंदे हे 11 आमदारांना घेऊन सुरतमध्ये गेले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना प्रस्ताव पाठवून दबावाचे राजकारण करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा प्रस्ताव नाकारून पक्षात कुणीही बंड करू शकणार नाही. कुणाही पुढे पक्ष झुकणार नाही हे दाखवून दिलं आहे. शिंदे यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे ऐवजी अजय चौधरी यांच्याकडे विधीमंडळ नेते पदाची धुरा देण्यात आली आहे. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. चौधरी यांची गटनेतपदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.एकनाथ शिंदे हे कालपासून नॉट रिचेबल होते. दुपारी विधान परिषदेची निवडणकू पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांना घेऊन गुजरातच्या दिशेने गेले. पालघर सोडल्यानंतर त्यांना लगेचच गुजरात पोलिसांनी संरक्षण दिलं.

म्हणजेच निवडणुकीनंतर गुजरातला जाण्याचं शिंदे यांचं आधीच ठरलं होतं. त्याचं प्लानिंगही झालं होतं. त्यानंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलमध्ये थांबले. तोपर्यंत शिंदे यांनी बंड केल्याचं कुणाला कानोकान खबर नव्हती. मात्र, शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आल्यानंतरही शिवसेनेच्या नेत्यांनी जल्लोष केला नाही. शिवसेनेकडून कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आलं नाही. त्यामुळे शिवसेनेत आलबेल नसल्याचं जाणवत होतं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!