google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीमहाराष्ट्र

अपोलोची ‘अनमास्क कॅन्सर’ मोहीम

कर्करोगानंतरच्या जीवनाचा एक मार्मिक शोध घेण्यासाठी, तसेच कर्करोगाविषयीचे सत्य उलगडणे, गैरसमज दूर करणे आणि समाजात सहानुभूती वाढवणे या उद्देशाने अपोलो कर्करोग केंद्र (एसीसी) अभिमानाने सादर करत आहे ‘अनमास्क कॅन्सर’. जागतिक कर्करोग दिवसाच्या निमित्ताने, कर्करोगावर मात केलेल्यांना सामना करावा लागत असलेल्या भेदभावाच्या दुर्दैवी वास्तवावर प्रकाश टाकण्यासाठी एसीसीने हे धाडसी पाऊल उचलले आहे. ‘अनमास्क कॅन्सर हा कर्करोगावर मात केलेल्या लोकांचा प्रवास आहे, ज्यांनी आपली अपवादात्मक कौशल्ये आणि पात्रता प्रदर्शित केलेली असूनही त्यांना त्यांच्या कर्करोगाच्या इतिहासातून उद्भवणाऱ्या सामाजिक पूर्वग्रहांशी संघर्ष करावा लागतो. ही मोहीम लोकांना त्यांच्या जीवनातील हा महत्त्वाचा पैलू लपविण्यास भाग पाडणाऱ्या पूर्वग्रहाबाबत असलेल्या व्यापक भीतीवर प्रकाश टाकते आणि त्यातून अशा प्रकारे भेदभावाचा सामना करत असलेल्या इतर असंख्य जणांचा अनुभवही व्यक्त करते.

जीवनाच्या विविध पैलूंमधील भेदभावाच्या गंभीर परिणामांचा अभ्यास करून, विचारांना चालना देणाऱ्या सामाजिक प्रयोगात्मक व्हिडिओचे ‘अनमास्क कॅन्सर’ उपक्रमात अनावरण केलेले आहे. सामाजिक, कॉर्पोरेट आणि स्वरूपाशी संबंधित पूर्वाग्रहांसह विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींचा या व्हिडिओमध्ये समावेश आहे. व्हिडिओमध्ये केवळ काही धीट कर्करोग विजेत्यांनी त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे स्वतःचा मुखवटा उलगडून दाखवला आहे. आजार समजून घेण्यास आणि त्याबाबतचा कलंक दूर करून सहानुभूती वाढवण्यास हे सत्र संधी देईल. जीवनात आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सहभागी आणि उत्साही लोकांना व्यावहारिक कौशल्यांमध्ये सक्षम करण्याच्या उद्देशाने, हे सत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी उपलब्ध असेल. हा सहभाग लोकांमध्ये समानता आणि सहानुभूतीची संस्कृती वाढविण्यात मदत करेल.

ऑन्कोलॉजी, अपोलो कर्करोग केंद्र नवी मुंबईचे वरिष्ठ सल्लागार आणि संचालक डॉ. अनिल डीक्रूझ म्हणाले, “एसीसीमध्ये आमचे ध्येय हे जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवण्यापलीकडे आहे. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भावनिक स्वास्थ्य देखील कर्करोगाच्या उपचाराचा एक महत्त्वाचा पैलू आहे. वैद्यकीय इतिहास काहीही असला, तरी प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण करण्यावर आमचा विश्वास आहे. कर्करोगातून बरे झालेल्यांना आधार आणि उभारी देणारा समाज  निर्माण करण्याच्या आमच्या समर्पणाचा ‘अनमास्क कॅन्सर’ हा एक पुरावा आहे.”

इंडियन कॅन्सर सोसायटीमध्ये सर्व्हायव्हरशिप अँड रिहॅबिलिटेशन विभागाशी निगडीत मिस प्रीती फड म्हणाल्या, “कर्करोगाच्या उपचारानंतरही या प्रवासात मनोसामाजिक आधार अत्यंत महत्त्वाचा असतो. सर्वांगीण काळजी प्रदान करण्याच्या आमच्या ध्येयाला ‘अनमास्क कॅन्सर’ पूर्णपणे अनुरूप आहे, ज्यामध्ये जगण्याच्या शारीरिक आणि भावनिक दोन्ही पैलू संबोधित केले जातात.”

अपोलो हॉस्पिटल पश्चिम क्षेत्राचे प्रादेशिक सीईओ श्री. संतोष मराठे म्हणाले, “कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांसमोरील आव्हाने आणि त्यांच्या उपचारांव्यतिरिक्त त्यांना समाजात भेदभावाचाही सामना करावा लागतो. जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि कर्करोग विजेत्यांनी कर्करोगावर विजय मिळवला असल्याचे त्यांनी उघडपणे सांगावे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनमास्क कॅन्सर हा एक अनोखा उपक्रम आहे. रुग्णाची स्वतःची आणि समाजाची अशा दोघांची मानसिकता बदलण्याची ही चळवळ आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!