पॅरागॉन फुटवेअरचा गोव्याच्या बाजारपेठेत प्रवेश…
मडगाव:
आघाडीचा फुटवेअर ब्रॅण्ड असलेल्या पॅरागॉन फुटवेअरने गोव्यामध्ये मल्टि-लेबल्ड स्टोअर्समधील उपस्थितीव्यतिरिक्त आपले पहिलेवहिले आणि स्वतंत्र स्टोअर सुरू करत दक्षिण गोव्याच्या मध्यवर्ती भागापर्यंत (पाजीफोंड, मडगाव) आपले क्षेत्र विस्तारले आहे. भारतातील हे ८६वे आगळेवेगळे स्टोअर फुटवेअरच्या चाहत्यांसाठी खरेदीच्या आनंददायी अनुभवाची हमी देणारे आहे. या स्टोअरच्या उद्घाटनसोहळ्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय दिगंबर कामत यांची उपस्थिती लाभल्याने या संस्मरणीय प्रसंगाला प्रतिष्ठेचे वलय प्राप्त झाले.
हे नवेकोरे पॅरागॉन फुटवेअर स्टोअर आपल्या नयनरम्य सौंदर्यासाठी आणि उत्साहाने भारलेल्या संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गोव्यातील एका सुंदर ठिकाणी उभारण्यात आले आहे. १२५० चौ. फुटांच्या ऐसपैस जागेवर उभे असलेले हे स्टोअर या संपूर्ण प्रांतातील खरेदीदारांच्या पादत्राणांच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारे स्थळ ठरणार आहे.
भारताच्या पश्चिमेकडील गोवा राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या व अनेक गजबजलेल्या बाजारांचे ठिकाण असलेल्या मडगावची या स्टोअरसाठी आपोआपच निवड झाली. या स्टोअरमध्ये पॅरागॉनची खास ओळख असलेल्या सर्व प्रकारच्या फुटवेअरचे विस्तृत कलेक्शन इथे ठेवले गेले आहे व वेगवेगळी पसंती, आवडनिवड असलेल्या तसेच वेगवेगळ्या वयोगटांतील ग्राहकांसाठी इथे निवडीचे विपुल पर्याय उपलब्ध आहेत.
या आऊटलेटमध्ये फ्लिप-फ्लॉप्स, स्पोर्टस् फूटवेअर, फॉर्मल शूज, सँडल्स आणि शाळेचे बूट अशा विविध श्रेणींमधील विविध प्रकारची पादत्राणे आहेत, जी स्त्री-पुरुष आणि लहान मुले अशा सगळ्यांच्याच गरजा पूर्ण करतात. पॅरागॉनने याहीपलिकडे जात अॅक्सेसरीज आणि बॅगांचेही विविध पर्याय देऊ केले आहेत व त्यामुळे या स्टोअरमध्ये संपूर्ण कुटुंबाच्या गरजा पुरविणारी एक सर्वसमावेशक उत्पादनश्रेणी उपलब्ध झाली आहे.