google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

क्रिसिलने वेदांताचे क्रेडिट रेटिंग अपग्रेड करून केले “AA”

क्रिसिलने वेदांताच्या दीर्घकालीन बँक सुविधा आणि डेट इन्स्ट्रुमेंट्सचे रेटिंग ‘AA-’ वरून ‘AA’ केले असून लघुकालीन रेटिंग A1+ ला दुजोरा दिला आहे.


रेटिंग अपग्रेडमधे एकूण ऑपरेटिंग नफ्यात (व्याज, कर, घट आणि कर्जमाफीपूर्व (ईबीआयटीडीए) मिळकत) वेदांताची अपेक्षित सुधारणा तसेच डेटमध्ये घट आणि सुधारित भांडवल आराखडा झाल्याचे क्रिसिलने आपल्या रेटिंग अहवालात म्हटले आहे.
क्रिसिलने असेही नमूद केले आहे की वेदांताचा एकूण ऑपेरिंटग नफा (ईबीआयटीडीए,ब्रँड आणि व्हीआरएलप्रती व्यवस्थापन शुल्क वगळता)आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४५,००० करोड रुपयांपेक्षा जास्त असण्याची  शक्यता असून त्याला प्रामुख्याने अल्युमिनियम,झिंक इंटरनॅशनल आणि लोखंडमध्ये वोल्युम ग्रोथ  तसेच झिंक व अल्युमिनियमची सुधारित किंमत क्षमता व धातूंच्या सर्वसाधारण किंमती यांचाही लाभ होईल.आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ईबीआयटीडीए(EBITDA) आणखी सुधारण्याची अपेक्षा असून त्याला सध्या क्षमता वाढवण्यासाठी आणि विशेषतः अल्युमिनियमधील कार्यकारी क्षमतेसाठी सुरू असलेल्या भांडवली खर्चाच्या पूर्णत्वाची जोड मिळेल.


गेल्या तीन महिन्यांत प्रमुख क्रेडिट एजन्सीने अपग्रेड देण्याची वेदांताची ही दुसरी वेळ आहे. सप्टेंबर महिन्यात आयसीआरएने वेदांता लिमिटेडचे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग AA- वरून AA वर नेले आणि त्यातून कंपनीची सशक्त क्रेडिट प्रोफाइल दिसून येत आहे.
कमॉडिटी व्यवसायात चक्रीयता सहन करण्याची वेदांताची क्षमता तसेच उत्पादनाचा कमी खर्च हे घटकही रेटिंग एजन्सीने अधोरेखित केले आहेत. ‘वेदांता समूह विविध व्यवसायांमध्ये कार्यरत असून त्यात झिंक, शिसे, चांदी, अल्युमिनियम, तेल आणि वायू, लोखंड, उर्जा व स्टील यांचा समावेश आहे. हा समूह या सर्व क्षेत्रांतील सर्वात आघाडीचा उत्पादक असून देशांतर्गत बाजारपेठेत समूहाने मजबूत स्थान मिळवले आहे. वैविध्यपूर्ण व्यावसायिक जोखीम समूहाला कमॉडिटीशी संबंधित जोखीम आणि चक्रीयतेपासून सुरक्षित ठेवते,’ असे क्रिसिलने नमूद केले आहे.


क्रिसिलने रेटिंगमध्ये वेदांता व्यवसायाचे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलवर (एनसीएलटी) स्वतंत्र नोंदणीकृत कंपन्यांमध्ये विभाजन करण्याच्या प्रस्तावाचीही नोंद घेत विभाजनच्या यशस्वी पूर्णत्वाची शक्यता वाढली आहे, असे म्हटले आहे.


वेदांताच्या युकेस्थित पेरेंट कंपनी – वेदांता रिसोर्सेस लिमिटेडलाही (व्हीआरएल)नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रेडिट एजन्सीकडून अपग्रेड मिळाले आहे.अमेरिकास्थित मूडीजने  व्हीआरएलचे कॉर्पोरेट फॅमिली रेटिंग B3 वरून B2 केले आहे आणि कंपनीच्या सीनियर अनसिक्युअर्ड बाँड्सचे रेटिंग Caa1 वरून B3 केले आहे. त्याशिवाय गेल्या महिन्यात फिचने व्हीआरएलचे पहिल्यांदाच B-  रेटिंग सकारात्मक दृष्टीकोनासह प्रकाशित केले आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!