google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

सणासुदीच्या हंगामासाठी ‘द गिफ्ट ऑफ वेलनेस’

वेलनेस फॉरएव्हर  फार्मसीने आता आगामी फेस्टीव्ह सिजनसाठी क्युरेटेड गिफ्ट हॅम्पर्स आणि गिफ्ट पॅकची श्रेणी ‘द गिफ्ट ऑफ वेलनेस’ लाँच केले आहे.

येथे फूड कॉटेगिरी एक्सपर्ट आणि व्यापारी- कर्मचारी वर्ग खास सणाच्या हंगामात प्रत्येकाच्या आवडी निवडी नुसार भेटवस्तू तयार करतात . या भेटवस्तूंमध्ये विविध सौंदर्य उत्पादने, विविध सुगंधीत उत्पादने, हेल्दी स्नॅक्स, चॉकलेट्स, पार्टीसाठी आवश्यक भेटवस्तू, आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स, चहा, कॉफीच्या श्रेणी व बरेच काही समाविष्ट आहे. रु.१९९ ते ८००० किमतीतील श्रेणीच्या भेटवस्तु येथे उपलब्ध आहेत. ग्राहक या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीतून निवड करून त्यांच्या पसंतीनुसार आणि बजेटनुसार हॅम्पर पर्सनालईज करू शकतात. सणासुदीचा उत्साह आणि त्यासोबतच भेटवस्तू देण्याची पद्धत्त लक्षात घेऊन, वेलनेस फॉरएव्हरने गिफ्ट हॅम्पर आणि कस्टमाइझ केलेल्या भेटवस्तूंसाठी प्रीमियम गिफ्ट पॅकेजिंग सोल्यूशन्स ठेवले आहे, ज्यात रिबन, कॉन्फेटी आणि फॅन्सी ट्रिमिंगसह , आलिशान बॉक्स आदि विविध प्रकारांचा समावेश आहे. शहरातील सर्वात जास्त मागणी असलेले सर्व गिफ्टिंग ऑप्शन्स येथे उपलब्ध असतील. लाँचच्या वेळी बोलताना अश्रफ बिरान ( संस्थापक आणि संचालक) म्हणाले,

“सण उत्सव भेटवस्तू देण्यासठी सर्वात मोठा काळ समजला जातो परंतु आम्ही मानतो की आज भेटवस्तू देणे ही केवळ सणासुदींपुरतीच मर्यादित गोष्ट राहीली नाहीए, एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी, महत्त्वाच्या क्लायंटसाठी, व्यवसायीक ठिकाणी, सहकर्मी यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करताना विशेष प्रसंगाची आवश्यकता नसते. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की भेटवस्तुंची मागणी आता पूर्ण वर्षभर असते. आम्ही यासाठी व ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेण्यासाठी खूप मेहनत केली आहे जेणेकरून आमच्या ग्राहकांना गिफ्टींगची आकर्षक श्रेणी मिळेल.  सायबल  बॅनर्जी, व्हाईस प्रेसिडेंट – मर्चेंडायझिंग आणि सप्लाय चेन पुढे म्हणाले,

“आम्ही आमच्या ग्राहकांना वेलनेस फॉरएव्हर नेटवर्कमधून उत्कृष्ट भेटवस्तू देण्याचे स्वप्न बाळगतो आणि त्याच दृष्टीकोनातुन कार्य करतो .‘द गिफ्ट ऑफ वेलनेस’ लाँच करताना आम्ही उत्साहित आहोत. खुप मेहनत घेणारी आमची टीम, क्युरेटिंग उत्पादने, क्राफ्टिंग पॅकेजिंग आणि मोठ्या प्रमाणातील ऑर्डर, सर्व्हिसिंग सह सर्व योग्य घटकांसह हा खरोखर एक प्रीमियम अनुभव आहे. या भेटवस्तूंच्या श्रेणीत प्रत्येकासाठी काहीतरी आहे, न्यू मॉम, फिटनेस लव्हर्स, जागतिक खाद्यपदार्थांपासून ते चॉकलेट प्रेमींसाठी, चहा आणि कॉफीच्या खास पारखींसाठी येथे बरेच काही आहे.” हे हॅम्पर्स अॅप, वेबसाइट आणि ४४ शहरांमधील ३०० हून अधिक वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्सवर उपलब्ध आहेत. जे तुम्ही दिवसा किंवा रात्री अश्या कोणात्याही वेळी घेऊ शकता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!