अर्थमत/ टेक्नॉलॉजी
ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर अन् पती दीपक यांना अटक
ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे. लोन फसवणूक प्रकरणी सीबीआयने ही अटक केली आहे. चंदा कोचर सीईओ असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला सुमारे 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात अनियमितता दाखवल्याचा आरोप केला होता. ईडीने फेब्रुवारी 2019 मध्ये या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. याअंतर्गतच कारवाई करण्यात आली. चंदा कोचर यांच्यावर भेदभाव आणि व्हिडिओकॉन समूहाची बाजू घेतल्याचा आरोप आहे.