
जियोची बेकायदेशीर लायनिंग?; शासनाचे कोट्यवधीचे नुकसान!
सातारा (महेश पवार) :
सातारा तालुक्यातील परळी विभागातील पोगरवाडी फाटा ते आरे दरे या रस्त्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतू बांधकाम विभागाच्या काही अधिकार्यांनी या मार्गावरच नव्हे तर संबंध परळी खोर्यात जिओच्या लाईन टाकताना नियमांची पायमल्ली करत ,आर्थिक देवाण-घेवाण करून बेकायदेशीर पध्दतीने जिओ च्या लाईन टाकल्या गेल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाने रस्ता ,साईटपट्टी,नाला यांच्या पलिकडे लाईन टाकण्याची परवानगी दिली असताना देखील थेट साईटपट्टी तर कुठे रस्त्यातून चर खोदून टाकण्यात आली. खरं तर हे सगळं होतं असताना देखील बांधकाम विभागाच्या अधिकार्यानी कारवाई केली नाही. यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण-घेवाण केली असल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून मंजूर झालेल्या पोगरवाडी फाटा ते आरे दरे रोड व परळी खोर्यात चुकीच्या मार्गाने टाकण्यात आलेल्या जिओ लाईनच्या खुदाई ने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून यास जबाबदार कोण ?असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
आरेदरे रोड ला चार कोटींचा नवीन रस्त्यासाठी बांधकाम विभागाच्या वतीने निधी मंजूर करण्यात आला आहे. जिओची लाईन चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आल्याने आरे दरे रोड साठी कोट्यावधी रुपये खर्चून करण्यात येणारा रोड चे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी शासनाने सदर कामांची चौकशी करून संबंधित अधिकारी व कंपनी यांच्यावर कारवाई करून भविष्यातील शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी सदर लाईन पुन्हा नियमानुसार टाकण्यात यावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
