google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

विजेचा धक्का लागून गाय दगावली…

पणजी:

मान्सूनपूर्व सरी गोव्यात बरसायला सुरूवात झाली आहे. सोमवारपासून राज्यात पावसाला सुरूवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मागील दोन दिवस राज्यात विविध ठिकाणी पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या तळी साचल्या, असेच, पर्वरीत साचलेल्या तळी जवळ वीजेचा झटका लागल्याने भटकी गाय दगावली आहे. GCA मैदानाजवळ ही घटना घडली.

भटकी गाय GCA मैदानाजवळून जात असताना जवळ असणाऱ्या वीज खांबाच्या जिवंत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यात पावसाचे साचलेले पाणी आणि सर्वत्र पडलेला कचरा दिसत आहे. येथे वीजेच्या धक्क्याने मृत झालेली गाय देखील दिसत आहे.


याठिकाणी वीजेच्या जिंवत केबल असल्याने अजून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. असे स्थानिकांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!